पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७९ मराठे सरदार, मुत्सद्दी, वगैरे. * १ नागपूरकर भोंसले. [ लेखांक १६६] श्री. - श्रीमत् परमहंस भार्गवबावा स्वामींचे सेवेसी:- सेवक रंघोजी भोंसले सेनासाहेबसुभा साष्टांग दंडवत विनंति येथील कुशल जाणून स्वकीय कुशलार्थलेखनआज्ञा करीत असले पाहिजे. विशेष. स्वामींनीं कृपा करून आशीर्वादपत्र पाठविलें, तेणेंकरून चि- त्तास परम संतोष जाहला. पत्र आज्ञा जे राजश्री भास्कर राम यांज-

  • महाराष्ट्रांतील सर्व मराठे सरदार, मुत्सद्दी, सुभेदार, वगैरे सर्व लो-

कांशी ब्रम्हेंद्रस्वामींचा पत्रव्यवहार असून त्यांच्यावर त्यांची पराकाष्ठेची भक्ति होती. हा सर्व पत्रव्यवहार उपलब्ध झाला तर स्वामींनी सर्व महाराष्ट्रमंडळाचें एकीकरण कसें केलें होतें तें उत्तमप्रकारें व्यक्त होईल. आह्मांस सर्व सरदा- रांची त्रोटक त्रोटक पत्रे पुष्कळ मिळाली आहेत त्यांपैकी विशेष महत्त्वाचीं तेवढींच पत्रे मासल्याकरितां येथे दिली आहेत. ती संगतवार नाहीत, तथापि त्यांवरून सर्व महाराष्ट्रमंडळ स्वामींच्या चरणीं कसें लीन झाले होतें हैं समजण्यास हरकत नाहीं. - १ रघोजी भोंसले:- नागपूरचे सेनासाहेब सुभे-पहिले रघोजी ऊर्फ बाबासा- हेब. कारकीर्द इ० स० १७३४-३० स० १७६१. २ भास्कररामः- रघोजी भोंसल्यांचे पराक्रमपटु सेनापति ह्यांचे उपनांव को- ल्हटकर ह्यांनींच गोंडवण, बंगाल व ओरिसा या प्रांतांवर स्वाऱ्या केल्या, व भोंसल्याचा अंमल दूरवर बसविला. ह्यांनी बंगाल प्रांतावर स्वारी करून बंगा लचा नवाब अलीवदींखान ह्यास जेरीस आणिले, ह्मणून त्यानें मकसुदाबाद ऊर्फ मुशिंदाबाद येथें भास्कररामांशीं तहाचें बोलणें लावून दगेबाजीनें त्यांचा वध केला. ही गोष्ट इ० स० १७३७ ह्या वर्षी घडली. ह्या अपराधाबद्दल भोंस- ल्यांनी बंगालच्या नवाबाची खोड मोडून भास्कररामाच्या वधाबद्दल 'मुंडकटाई' ह्मणून त्याच्याकडून १४ लक्ष रुपये खंडणी घेतली. भास्कररामाचें चरित्र फार वीररसप्रचुर आहे.