पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७८ त्याप्रमाणें तीनशें त्यास पावतील. आह्मी रा० बापुजीपंत यांस लिहून पाठवितों. तीर्थरूप राव व आपा यांचे निष्ठेचा अर्थ लिहिला तर त्यांची निष्ठा स्वामींचे चरणारविंदीं तैसीच होती. तदनुरूप त्यास फला- देश जाहला. तदन्वर्येच आमची निष्ठा स्वामचरणारविंदी आहे. देव धर्म सर्व स्वामींचें चरण जाणतों. आमची निष्ठा स्वामींचे चरणार- विंदीं त्रिकर्णपुरस्सर आहे व स्वामींचीही कृपा आमच्या ठायीं निर- वधि आहे. तेणेंकरूनच आमचें कल्याण असे. पाचा आठ, त्याच्या मो- हरा १३ व मुगुटास मोहरा ७ एकूण वीस मोहरा पाठवून देणें झणजे आपाचें वचन उतराई जाहलेंच. नानाचे फत्तेनिमित्य तीन महारुद्र करावयाचा संकल्प केला आहे. त्यांपैकी दोन महारुद्रांचें साहित्य आह्मी करितों. एका महारुद्राचें साहित्य तुझीं करून पाठविणें ह्मणून कित्येक आशा केली. ऐसीयास स्वामींचें आज्ञेप्रमाणे मोहरा व एक महारुद्राचें साहित्य आझीं करून द्यावें. येणेंकरून आझांसच श्रेयस्कर आहे. परंतु आझी लेकरूं, अद्याप तीर्थरूप नानांची मर्जी आमच्या हातीं नाहीं. याकरितां तीर्थरूप रा० नाना येत तो स्वामींनीं कृपा क रावी. तीर्थरूप आलीयावर स्वामी आज्ञा करितील तदनुरूप ते आज्ञेप्रमाणें वर्तणूक करितील. तीर्थरूप राव व आपा होते [त्या वेळीं] आपा थोर होऊन जे रायांनी कर्तव्य संपादावें तैसें आपा संपादूं लागले. तें रायासही मान्य होत गेलें. तैसेंच आलांपासून घडून येणें तें स्वामींचेच कृपाकटाक्षे- करून घडेल. आणि मजपासूनही स्वामींचे चरणाजवळ अंतर पडेल ऐसें नाहीं. स्वामींनी सर्व प्रकारें मजवर कृपा करावी. मखमलअल्ली तुझांस पादाक्रांत व्हावा, तुमची फत्ते व्हावी, [या] निमित्यें दुपेटा सफेद पाठविला आहे घेणे ह्मणोन, तर दुपेटा शिरसा वंदिला. स्वामींनी मख- मलअल्लीविसीं आशीर्वाद दिल्हा तो प्रमाणच स्वामींचें वाक्य अन्यथा कैसें होईल ? सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. ●