पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७७ पिंपळदरा आमच्या घोडीं व गुरांस चरावयास दिल्हा, दोन वर्षे कुरण राखून चारिलें, हल्लीं तेथें गुरे घोडीं ठेवणार तरी नारोपंतास ताकीदपत्र देणें ह्मणोन. त्यावरून ताकीदपत्र दिल्हें आहे. पहिल्यापासून आपले- कडे कुरण चालिलें असेल त्याप्रमाणे चालेल. यमाजी ह्मसकर पाटील मौजे दाळिंवें याच्याविशीं आज्ञा केली तरी त्यास येथें पाठवावें. त्याचें वर्तमान मनास आणून आशेप्रमाणे कौल देऊं. अनंतभट वगैरे ब्राह्मण यांस दक्षणा आठ जणांस द्यावयाविशीं आज्ञा केली त्याजवरून त्यांस दक्षणा देऊन रवाना केलें. परशरामी ब्राह्मण एकटा (ढोंग) करून पैका मेळवून कर्ज आपले वारितो, त्यानें लिहिले न मानावें ह्मणोन, तरी स्वामी ईश्वरी अंश आहेत. सर्व स्वामींस विदित आहे. त्यांनी (ढोंग) करणें काय! असो. आह्मांस स्वामींची आज्ञा प्रमाण आहे. वांसे शंभर व तुळया दहा द्यावयाविस आज्ञा केली, त्यास आमचा कारखाना सातान्यास नाहीं. असता तरी लक्षप्रकारें देव- वितों. येथून शिवार द्यावा तर जातो कसा ? येरव्हीं स्वामींचे आशेपेक्षां विशेष काय आहे ! सुरवारी हिरड्याविसीं लिहिलें, तर यत्न करून मागाहून पाठवून देतों. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. , [ लेखांक १६५ ] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसीः- चरणरज सदाशिव चिमणाजी कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञा पना. येथील कुशल ता० फाल्गुन शुद्ध चतुर्दशीपर्यंत स्वामींचे आ- शीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जाहला. जगन्नाथ चिमणाजी याचेविसीं स्वा- मींनीं लिहिलें, तर, त्यास सातारीयाचे मुकाम शंभर रुपये जाजती करून दिल्हे आहेत याचें स्मरण नव्हतें. स्वामींनीं सनदेची नकल पाठविली ते पाहिली. शंभर रुपये जाजती करून दिले प्रमाणच आहे. १२ . -