पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७६ ● व कित्येक विषादेकरून आज्ञा केली तें सविस्तर कळलें, ऐशास स्वामींनीं आज्ञा केली तें यथार्थ आहे. स्वामी ईश्वरस्वरूप आहेत. वडिलीं स्वा- मींचे पाय अर्चून अभीष्ट करून घेतले तदन्वयेंच स्वामीचरणारविंदीं निष्ठापूर्वक वर्तावें यांतून दुसरें आझांस विशेष नाहीं. व जें आहे तें स्वामींचे आशीर्वादाचें असे. स्वामींनी अभय हस्त आमच्या मस्तकीं ठेविला. मीं लेकरूं स्वामींचें असतां मजवर कोप कैसा होईल व मज- पासून स्वामींचे सेवेसी अंतर कैसें पडेल ? स्वामींचे चरणाव्यतिरिक्त दुसरें दैवत जाणत नाहीं. घांटा व पेट्या व पालखीविशीं आज्ञा केली त्यास, पहिलें स्वामींचें पत्र याविशीं आलें तेच समय वसईस व साष्टीस लिहिले आहे. घांटा व पेट्या येतील, अतःपर विलंब नाहीं. सेवेसी पाठवून देतो. वरकड वस्त्रे पाठवावयास विलंब लागला हाणोन कि त्येक आज्ञा केली, तर मजपासून अंतर पडलें; क्षमा करावी. दोनशें वांसे भुलेश्वरास पाठवावयाविशीं व दारूविशीं रा० दादोबास आज्ञा केली, त्यास पहिली स्वामींनीं शंभर वांसेयाची आज्ञा केली त्याप्रमाणें भुलेश्वरास पाठविले. आणखी शंभर वांसे पाठवावयास लिहिले तर आह्मांस स्वामींचे आशेपेक्षां विशेष काय ? शंभर वांसे पाठवितों व दारू वसईहून आणून पाठवितों. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक १६४ ] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसवावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज सदाशिव चिमणाजी कृतानेक विज्ञापना, येथील कुशल ता० वैशाख शुद्ध त्रयोदशीपर्यंत स्वामींचे आशीर्वादेकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जाहला. प्रसादाची वस्त्रे सोमाजीहस्तें पाठविलीं:– १ तिवट, १ शेला - पैठणी, १ साडी, १ चोळखण, एकूण चार पाठविलीं तींपावलीं. स्वामींचे आशीर्वादेंकरून लग्नसिद्धि जाहली. मौजे साकुर्डी येथील कुरणांतील पक - -