पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७५ [लेखांक १६३] श्री. - श्रीमत् महाराज श्री परमहंस स्वामींचे सेवेसी:- चरणरज सदाशिव चिमणाजी कृतानेक विज्ञापना येथील कुशल चैत्र शुद्ध षष्ठी भोमवारपर्यंत स्वामींचे कृपेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. घाटा व पेट्या आणविल्या आहेत त्या आल्या ह्मणजे पाठवून देतों ह्मणोन केसो बराबरी सांगून पाठविलें असतां अद्यापि आल्यानाहींत. यावरून तुझीं बोलतां व लिहितां तें अवधें लटिकें ह्मणून स्वामींनीं आज्ञा केली. ऐ- शास स्वामींजवळ आह्नीं लटिकें बोलावसें काय आहे ? स्वामींच्या पाया विना आझांस दुसरें दैवत नाहीं. घांटा व पेट्यांविशीं रा० शंकराजी के- शव यांस पूर्वी लेहून पाठविले आहे व प्रस्तुतही लिहिले आहे. घांटा व पेट्या येतील तेक्षणीं सेवेसी पाठवून देतों. स्वामींच्या पायांपासीं अं- तर होणार नाहीं माळशिरसास यांसे देवविले आहेत ते अद्यापि पा- वले नाहीं. लगोन आज्ञा, तरी रा० जिवाजी गणेस यांस सांगितले आहे. अविलंबेंच बांसे प्रविष्ट करितील. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक १६४ ] श्री. - श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज सदाशिव चिमणाजी कृतानेक विज्ञापना. येथील कुशल ता० चैत्र बहुल तृतीया भानुवासरेपर्यंत स्वामींच्या आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जाहला. देवास घांटा दोन व पेट्या दोन व पालखी तुमच्या तीर्थरूपांनीं देऊं केली ते हा काळपावेतों दिल्हें नाहीं ह्मणून मागें वर्तलीयाची साक्ष व प्रस्तुत अंतर पडल्यास कोप होईल ह्मणून १ चैत्र शुद्ध षष्ठी भोमवारः - ता० ३० मार्च ३० स० १७४२. - २ चैत्र बहुल तृतीयाः - ता० १२ एप्रिल इ० स० १७४२. -