पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७४ ता० हवेली परांडें येथील सनदा त्याजकडील आणून पाठवर्णे झणजे तुझीं ह्यातारपणों पालखींत बैसविल्याचे श्रेय तुमच्या पदरीं पडेल" ह्मणोन कित्येक लिहिलें तें कळले. एशास स्वामींची आज्ञा ते प्रमाण, आमचा व जानोजी निंबाळकर यांचा स्नेह आहे खराच, परंतु आझी मशारनिव्हेस लेहून पाठविले आहे. स्वामींचे कार्यास आह्मांपासून अंतर होईल ऐसें नाहीं. त्याजकडून कार्य होऊन आल्यास उत्तमच आहे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. सदाशिव चिमणाजी. [ लेखांक १६२] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसवावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज सदाशिव चिमणाजी कृतानेक विज्ञापना. येथील कुशल ता० माघ शुद्ध चतुर्दशी रविवारपर्यंत स्वामींच्या आशीर्वादेंकरून यथा- स्थित असों विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जाहला. स्वामींनीं कृपा करून ममतायुक्त आज्ञा केली ते शिरला आहे. आझी लेकरूं स्वामींचें असें व जे आहे तें स्वामींच्या आशीर्वा दाचें आहे. समाधीचें वस्त्र शाल पाठविली ते पावली. आज्ञेप्रमाणें स्नान- संध्यासमयीं पांघरत जाऊं. रा० शंकराजी केशव व खंडोजी माणकर व बरवाजी ताकपीर यांस ताकीदपत्रे देवाव ह्मणोन लिहिलें, त्याजवरून- आशेप्रमाणें त्रिवर्गास ताकीदी पाठवितों, वरकड रा० पिलाजी जाधव- राव यांज Xxxx ( फाटले आहे) ध्यावयाविर्सी आज्ञा केली, तर, ते स्वारीस गेले आहेत. आलीयावर घडेल. खामींच्या मुखांतून निघालें तें अन्यथा कैसें होईल ? सोनजी पाटील यांचे चालवावयाविस आज्ञा, तर, लक्षप्रकारें चालवूं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. - १ माघ शुद्ध चतुर्दशी रविदार:- ता० ७ फेब्रुवारी ३० स० १७४२. -