पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७३ कचेश्वर गोविंद यांस किल्ले नारायणगड येथील कारखानिसी क डील फडणिसी आहे. सर्वोस अडसेरी पावते त्याप्रमाणे यांस अडसेरी . , करून सनद करून द्यावी; व लक्ष्मण कचेश्वर पाथरवटाचें लिहिणें लिहितो, त्यास ते ऐकत नाहीं, त्याची तैनात करून सनद पाठवावी झणोन आज्ञा, ऐशास यंदा असामीची अथवा आणखी कांहीं आज्ञा करावी ऐसें नाहीं. पुढें आझीं स्वामींचें आज्ञेखेरीज नाहीं. स्वामींनीं कृपाच केली पाहिजे. सर्व स्वामींचे आहे. फार काय लिहावें दे विज्ञापना. [ लेखांक १६०] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना येथील कुशल ता० भाद्रपद शुद्ध चतुर्दशीपर्यंत स्वामींचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें पावले. "तुझीं श्रीचे दर्शनास जाणे. जे मागावयाचें तें मागणे. श्री तुझांस देईल. संदेह नाहीं." ह्मणोन आशा केली ते शिरसा [ मान्य ] आहे. स्वामींचे आशेप्रमाणे श्रीस जाऊन दर्शन घेऊन विनंति कर्तव्य ते करूं आणि आज्ञा घेऊन जाऊं. आझांस स्वामींचे पायाखेरीज काय आहे? सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक १६१ ] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- - चरणरज बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना येथील कुशल ता० आश्विन शुद्ध चतुर्थी पर्यंत स्वामींचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जाहला. "तुमचा व रा० जानोजी निंबाळकर यांचा स्नेह आहे, तर त्यांजकडे दोघे भले माणूस पाठवून रोपले गांव