पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७२ मेरुलिंगाचे ब्राह्मणांस आझीं दक्षिणा देणार नाहीं. तूप बारा मण व नव मण दारू व चार तोळे केशर कबूल केले आहे तें देवणें ह्मणोन, तर केशर चार तोळे पाठविले आहे. तूप व दारूच्या चिठ्या पुण्यास देत होतो, त्यास सोमाजी बोलिला कीं, तुझीं पुण्यास जाल तेव्हांच आह्नीं पुण्यास येऊन घेऊं. पशमी थानांविशीं आज्ञा, त्यास पुण्याहून थानें आलीं नाहींत. येतांच सेवेसी पाठवून देऊं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक १५८ ] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसवावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना ता० छ० १२ जिल्कादपर्यंत स्वामींचे कृपेंकरून येथील वर्तमान यथास्थित असे विशेष. आशीर्वादपत्र पाठविलें तें पावले. रा० राणोजी शिंदे यांजकडील रुपयांचा मजकूर लिहिला तो कळला. ऐसेयास सदरहू रुपये आणा- वयास मशारनिल्हेकडे मुजरद जासूद पाठविला आहे. तो रुपये घेऊन लवकरच येईल. पाठवून देऊं. थोडक्या दिवसांसाठीं जलदी करावी ऐसें नाहीं. उदेपूरचे मजमूचे वेतनाचा मजकूर लिहिला तो कळला. त्याजवरून अडीचशे रुपये करार करून सनद पाठविली असे. विदित जाहले पाहिजे. सर्वदा कृपापत्र आनंदवीत जावें. पहिले दोनशें होते ते आज्ञेप्रमाणें अडीचशे केले. राणोजी शिंद्याकडील रुपये सत्वरच येतील. विलंब लागणार नाहीं. हे विज्ञापना. [ लेखांक १५९] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना येथील कुशल ता० भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत स्वामींचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनी आशीर्वादपत्र पाठविलें तें पायलें. -