पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वर्तमान तागाईत छे० २५ रचिलाखर पावेतों स्वामींचे आशीर्वाीदेंकरून यथास्थित असे विशेष. स्वामींचे वार्षिक पूर्वी तीर्थरूपांनीं रुपये ६१०० सहा हजार एकरों रुपये करार केले आहेत त्याप्रमाणें आलीं कबूल केले आहेत. यास तपशील :- ६००० रुपये ऐन नक्त; १०० जिन्नस सुगं- धराज वजन पके ८५ व जायफळ वजन पके ८१ व लवंग वजन पक्के ४३ व साखर बुरा वजन पक्के ३ एकूण किंमत करार येणेंप्रमाणें सहा- हजार एकरों रुपये श्रावण अखेर प्रतिवर्षी देत जाऊं सुरू सन खंमस आर्बेन मया व अलफ खेरीज, जगन्नाथ चिमणाजी याची असामी प्रांत पुणे येथें आहे त्यास वेतन रुपये ३०० तीनशे प्रांत मजकुरपैकी पावत आहेत त्याप्रमाणे साल दरसाल पाववीत जाऊं. सेवेसी श्रुत होय हे हे विज्ञापना. [पै० छ २९ रबिलाखर सन खंमस आर्चाआन. ] [ लेखांक १५७ ] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसचावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना येथील कुशल स्वामींचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें पावलें. गुदस्ता मेरुलिंगास दोन ब्राह्मण अभिषेकास लाविले होते त्याप्रमाणे यंदा लावावे लागतात, त्यास पोटगी देखील दक्षिणा तेवीस रुपये द्यावे लागतात ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशास गुदस्ता मेरुलिंगास अभिषेकास ब्राह्मण लाविले त्याप्रमाणें साल दरसाल लावावयाचा आह्नीं करार केला नाहीं, परंतु हल्लीं स्वामींनी लिहिलें त्याजवरून सोमाजीहस्तें रुपये २३ तेवीस पाठविले आहेत. घेऊन मेरुलिंगास अभिषेक श्रावणमासीं करवावा. पुढें . . - १ छ० २५ रविलाखरः - ता० २७ मे इ० स० १७४४, रविवार. २ छ० २९ रविलाखर :- ता० ३१ मे इ० स० १७४४, गुरुवार