पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ पत्र करून दिलीं (पृ० १३ )" असा मजकूर आहे. ह्यावरून सन खमस अशरीनांत ह्मणजे ३० स० १७२४-२५ ह्या सालीं, स्वामी सातारा प्रांतीं आले अर्से सिद्ध होतें. ह्यानंतर स्वामींनी ३० स० १७२५-२६ सन सीत अशरीन मध्यें बाजीराज बल्लाळ पेशवे ह्यांचेकडून मौजे पिंपरी तर्फ कडेपठार हा गांव इनाम करून घेतला. राजशक ५२ ह्मणजे इ० स० १७२६ ह्या वर्षी श्रीमंत छत्रपति शाहु महाराज ह्यांनी जोत्याजी केसरकर ह्यांस दिलेले अस्सल आज्ञापत्र आह्मांस उपलब्ध झाले आहे. त्यावरून स्वामींकडे मराठ्यांच्या तर्फेनें इ० स० १७२६ मध्ये आठ गांव इनाम होते असे दिसतें हैं आज्ञापत्र येणेप्रमाणे:- कोंकण प्रांते. १ मौजे माहुलंगें ताा पांवस १ मौजे डोरलें ता पांवस १ मौजे कळंबुसी १ मौजे नायसी ४ “स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ५२ विश्वावसूनाम संवत्सरे भाद्रपद बहुल त्रयोदशी गुरुवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शाहु छत्रपति स्वामी यांणीं राजमान्य राजश्री जोत्याजी केसरकर आर सरदेशमुखी यांणी आज्ञा केली ऐसीजेः—श्री येथील महोत्सवास गांव कुलबाब कुलकानू देखील सरदेशमुखी स्वराज्य व मोंगलाई इनाम दिल्हे असेत. वितपशीलः– - - वरघांट प्रांतें. १ मौजे इडमिड (वीरमाडें) १ मौजे अनेवाडी १ मौजे पिंपरी १ मौजे धावडशी येणेंप्रमाणे आठ गांव दिल्हे असेत. तेथील सरदेशमुखीचा ऐवज होईल तो श्रीकडे पावेल. तुझीं सरदेशमुखीचा तगादा न करणें खलेल न करणे. १. ह्या गांवांची अस्सल इनामपत्र आह्मांस उपलब्ध झाली नाहींत त्यामुळे त्यांची बरोबर मित्ती देतां येत नाहीं. पिंपरी गांव:बद्दल विष्णु गोपाळ भागवत यांनी ता० १९ माहे मे इ० स० १८४९ साली दिलेल्या कैफियतीची नक्कल आह्मांस मिळाली आहे. तींत पिंपरीबद्दल बाजीराव पंडित प्रधान यांनी दिलेल्या ताकीदपत्राची तारीख छ २९ मोहरम सुरु सन सीत अशरीन ही दिली आहे. ह्यावरून त्याच समयास हा गांव मिळाला हे स्पष्ट आहे.