पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७० मींस ईश्वरातुल्य आझीं मानितों स्वामींचा कंटाळा आह्मांस यावा ऐसी निष्ठाच आमची स्वामींच्या पायांसीं नाहीं. बोलल्याप्रमाणें वर्तावें युक्तच आहे. त्याजवरून रुपये ६००० वार्षिकाचे; १०० सुगंध ८८५ व जायफळ ८८१ व लवंग ८८१ साखर बुरा ८३ एकूण शंभर रुपये पेशजीस स्वामींनीं करार केले ते; एकूण सहा हजार एकरों रुपये राजश्री दादोबापासून स्वामींस देविले आहेत. सालाबाद पावतात त्याप्रमाणें स्वामींचे सेवेसी पावतील. आठ पांचा दर रुपये १५ प्रमाणे व मोहरा ८ पाठवणे हाणोन आज्ञा, याजवरून सोमाजीबराबर रुपये १२० पाचा आठ दर १५ प्रमाणें, ११२ मोहरा ८ दर १४ प्र- माणें येणेंप्रमाणें दोनों बत्तीस पाठविले आहेत. सेवेसी प्रविष्ट जा हलियाचें उत्तर पाठविले पाहिजे. राजश्री जगजीवन धोंडदेव याची बेगमी करून घरास पाठवावे ह्मणून आज्ञा, त्यास तीर्थरूप कैलासवासी आपांनीं जगजीवन धोंडदेव याची नेमणूक केली असेल त्याप्रमाणें त्याची बेगमी करूं. स्वामींस अगत्य तेंच आझांस अगत्य आहे. दत्ताजी कनोजे यांचे पुत्र सयाजी कनोजे यांजविषयीं स्वामींनीं आज्ञा केली त्यास स्वामींनी त्यांस आझांकडे पाठवून द्यावें. त्यांजपासून सेवा चा- करी घेऊन सर्वप्रकारें चालविले जाईल. घोडियाविसीं लिहिलें त्यास पुण्याहून घोडे आणविले आहेत. आलियावर सेवेसी पाठवून देऊं. प्रसाद अंबर वस्त्र, मध घागर १ व गाडगें १ पाठविलें तें पावलें. बहुत काय लिहिणें कृपा केली पाहिजे हे विज्ञापना. [ पै ॥ छ० १७ जमादिलावल गु ॥ सोमाजी घाणेकर व खंडोजी साळवी सन इसन्ने रुपये २३२ ] श्री. [ लेखांक १५६ ] - श्रीमत् महाराज श्री परमहंस भार्गवरामबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज बाळाजी बाजीराऊ प्रधान कृतानेक विज्ञापना येथील