पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६९ कुशल ता० मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीपर्यंत यथास्थित असे विनंति, स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें पावोन बहुत समाधान जाइलें. " चिरंजीव रा० आपाचे शरीरीं व्यथा जाहली होती यास्तव चित्त स्वस्थ नव्हतें. तन्निमित्य श्रीची प्रार्थना केली. आपास आरोग्य होईल. चिंता न करणें. " ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशास स्वामींनीं कृपा करून तीर्थरूपांस आरोग्य होईल ह्मणून लिहिलें तेव्हां ईश्वरी कृपा जाहली. स्वामी ईश्वरस्वरूप आहेत ऐसें समजोन संतोषरूप असो. प्रसाद पाठविला तो पावला. वडिलांनीं आंगरेयाविसीं लिहिलें तर स्वामींचे आशेपेक्षां आह्मांस अधिक काय आहे? तुळाजीस पुण्यासच आणविले असे. बेडीही तोडविली आहे. स्वामींनीं कृपाकरून तीर्थरूपास आरोग्यता सत्वर होय तें केलें पाहिजे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक १५५ ] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक नमस्कार विज्ञापना येथील कुशल तागाईत अधिक बहुल चतुर्थीपर्यंत स्वामींचे आशी- र्वादेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं सोमाजीबराबर आशी- र्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जाहला. “आमचा कंटाळा आला असेल तर आमची कामें राहतील. नसेल तर वार्षिक रुपये ६००० सहा हजार व जिन्नस पके सुगंध ८८५ व जायफळ ८८१ व लवंग ८८१ साखर बुरा ८३ पाठवणें" हाणोन आज्ञा ऐशास स्वा- - - १ मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीः - ता० १५ नोव्हेंबर इ० स० १७४० शनिवार. चिमाजी आपा सावान झणजे कार्तिकाच्या महिन्यांत आजारी पडले व त्याच दुख- ण्यांत त्यांचा पौष महिन्यांत (शुद्ध १० रोज बुधवारी) अंत झाला. त्याच दुख- ण्यांतील हे पत्र असावें हे उघड आहे. २ अधिक (श्रावण ) बहुल चतुर्थी: - ता० २० जुलई इ० स० १७४१ सोमवार.