पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६८ नेऊन अटकेंत ठेवील. येविस किल्लेमजकुरचे हवालदारास ताकीद करून पत्र पाठविले आहे. व येविसीं डवल्या व रंभाजी निंबाळकर व याचा लेक जानोजी निंबाळकर व सुलतानजी निंबाळकर यांस पत्र लेहून पाठवणें लणून आज्ञा, ऐसीयास आपले आज्ञेप्रमाणें त्यांस पत्रे लेहून पाठवितों. हे विज्ञापना. बाळाजी बाजीराव. [ लेखांक १५३] श्री. श्रीमन्महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- ● चरणरज बाळाजी बाजीराव साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील कुशल ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी सौम्यवासर पावेतों कृपाकटाक्षे यथास्थित असे विशेष. स्वामींनी कृपाकरून आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट काळीं मस्तकीं वंदिलें. "रायाचें वर्तमान ऐकोन श्रम विशेष जाहले. तुझींही विवेकेंकरून मन आवरणें व श्री भार्गव आमचे मस्तकीं आहे. पहिल्यापेक्षां विशेष कल्याण होईल" ह्मणून आज्ञा, तरी जहाले गोष्टीस उपाय नाहीं. खेद करून काय होणें ? वरकड स्वामींचा आशीर्वाद मस्तकी आहे तेणेंकरूनच आजिपावेतों उत्कर्ष होणें तो जाहला. तदनुरूपच स्वामींच्या आशीर्वादप्रतापेंकरून होणें तं होईल. प्रसाद चांदणी शेला पाठविला तो पावला. सर्व भरवसा स्वामींचे पायाचा आहे. विस्तार काय लिहिणें? सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. ● ● - [ लेखांक १५४ ] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना येथील १ ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीः - ता० २८ मे ३० स० १७४० बुधवार -