पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६७ [ लेखांक १५१ ] .श्री. - श्रीमत् परमहंसबावा स्वामींचे सेवेसी: - चरणरज चिमणाजी बल्लाळ कृतानेक विज्ञापना येथील वर्तमान ता० छ० १५ जिल्कादपावेतों स्वामींचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे शेष स्वामींचे कोटीचे बैल कोकणांत गेले होते, त्यांजपासून जकातीचे कमाविसदारानें जकात घेतली आहे ती कमाविसदारास ताकीद करून रुपये पाठवून देणें ह्मणून आशा लिहिली होती. त्याजवरून स्वामीक- डील मोरया कोटवळा याजबराबर आपले माणूस देऊन जकातीचे कमाविसदाराकडे पाठविलें. त्यास, पेणेच्या बंदरीहून दस्तकाखेरीज किराण्याचे बैल जाजती आले होते ते, व दस्तकापूर्वी किराण्याचे बैल खोपवलीच्या मार्गे नेले त्याजपासून खोपवलीचे कमाविसदारांनीं आंगठी सोन्याची रामनामाची घेतली होती ती, येणेंप्रमाणें चौकसीकरितां ठि- काणीं लागले ते, खंडोजी साळवी महाराजांकडोन आला त्याजबराबर रुपये नक्त १२ बारा व आंगठी १ एक पाठविली आहे. परंतु दस्तका खेरीज जाजती बैल गेले त्याचा हांशील वाजवी घ्यावा ऐसें आहे. त्यामध्यें स्वामींची आज्ञा होईल त्याप्रमाणें वर्तणूक करूं हे विज्ञापना. [ लेखांक १५२ ] श्री. श्रीमत् परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- - चरणरज चिमणाजी बल्लाळ कृतानेक विशापना येथील वर्तमान छ० १५ जिल्काद पावेतों स्वामींच्या आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष. स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें पावलें. जिवाजी देवरु- ख्याचें वर्तमान लेहून पाठविलें तें सविस्तर कळले. त्याचीं माणसें मौजे माळशिरसास आहेत तीं कैद करून पुरंधरास नेऊन ठेवणें हाणून आज्ञा केली; त्यावरून कोंडाजी यादव याजबराबर पांच माणसे देऊन पाठविला आहे. हा त्या बायका असतील त्या घेऊन किल्ले पुरंधरास