पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६६ कवाड रुपये २५ बाबजी गायकवाड, १५ बाबजी मोया, १० संभाजी शेवगा एकूण पन्नास रुपये पाठविले. सदरहुप्रमाणें स्वामींनीं ज्याचे त्यास प्रविष्ट करावे. वरकड असाम्या मेल्या त्याचे येसजी मागत होता. परंतु स्वामींनीं पत्र लिहिलें ...... व ठार्णेयाहूनही त्यांची नांव- निसी ............ आली नाहीं. तेथून लेहून येईल व खामी लिहून पाठवतील तेव्हां वरकडाचीही बेगमी करून देणें तें देऊं. येसजी गायकवाड यास चाकर करीत होतों, परंतु प्रस्तुत चाकर राहत नाहीं. महिन्या दोन महिन्यांनीं चाकर राहीन ह्मणतो. यास्तव निरोप दिल्हा असे. पुढे आल्यावरी चाकर करून ठेविला जाईल. बाबजी गायकवाड याचे बायकोस लुगडें व मुलांस मुंडासें व बाबजी मोऱ्या याचे बायकोस लुगडें, मुलास मुंडासें, व संभाजी शेवगा याचे बायकोस लुगडें दिल्हें असे. प्रविष्ट करावें. येसजीस मुंडासें दिल्हें असे. सेवेसी श्रत होय हे विज्ञापना. [ लेखांक १५० ] श्री. श्रीमत् परमहंस महाराज श्री स्वामींचे सेवेसीः— - चरणरज चिमणाजी बल्लाळ कृतानेक विज्ञापना येथील कुशल श्री कृपें असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें पावलें. कोठीचे बैल कोकणांत गेले होते त्याजपासून कमाविसदारांनीं रुपये ३९ एकूण- चाळीस व आंगठी घेतली आहे ते देववावीं ह्मणून आज्ञा, त्यास कोणत्या कमाविसदारांनीं काय रुपये घेतले ते तहकीक करून आणा- वयास पत्र व माणूस मुजरद पाठविलें आहे. कोठीवाला स्वामींचा ठेवून घेतला आहे. कमाविसदारांनीं रुपये काय घेतले हैं लिहून येईल. दस्तकाप्रमाणें बैल असतां रुपये घेतले असले तरी रुपये घेतले असतील ते पाटवून देऊंच. कदाचित् दस्तकाखेरीज जाजती बैल असले आणि त्यांज पासून हांशिलाचे रुपये घेतले असले तरी स्वामींस लिहून पाठवून आपली आज्ञा होईल त्याप्रमाणें वर्तणूक करूं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.