पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६५ आहे. पूर्वीच स्वामीपुढे उभी केलीच होती. आतांही सारी बिशाद स्वामींपुढे आहेच. घांट, पेट्या, स्वामीकडे रवाना करितों येऊन पावतील, लवंग जायफळ साखर जायपत्री [पाठवावया- विषयीं स्वामींनीं !] आज्ञा केली, तर आषाढमास हा जिन्नस एकवेळ स्वामींकडे पाठविलाच आहे. पुढेही आशेप्रमाणे पाठवून देऊं. मा- ळशिरसच्या पाटलाच्या पारपत्याविषयीं आज्ञा केली, त्यास सांप्रत आह्मीं दूर लांबलों आहों. भिवाजी गांवीं आहे कीं नाहीं हे तहकी- कात करून आणवितों आणि तहकीक कळल्यावर स्वामींचे आज्ञे- खेरीज दैवत आहेसें नाहीं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. , [ लेखांक १४९ ] श्री. श्रीमत् परमहंसवावा स्वामींचे सेवेसी:- .... - अपत्यें चिमणाजी वलाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल ता० छै० १८ रबिलावल स्वामींचे कृपेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्री आज्ञा केली की, “बाबजी गायकवाड तुझांकडेस होता त्यास जखमा लागल्या आहेत ह्मणोन ऐकतों. त्यास, तो मेला किंवा जीवंत आहे हे लेहून पाठवणें. व संभाजी शेवगा, बावजी मोरे मेले असतील (फाटलें आहे) वस्तभाव येसजी गायकवाड याचे हवाला करणें व येसजीस चाकर आपणाजवळ ठेवणें, ते मात पोख्ती करणें" ह्मणोन लिहिलें, ऐशासबाबजी गायकवाड व संभाजी शेवगा व बाबजी मोय हे तिघेही मयत जाहले. त्यांची वस्तभाव कांहीं राहिली नाहीं. जेथें मेले तेथेंच गेलीं. हल्लीं त्यांचे कबिल्यांची बेगमी जाहली पाहिजे याकरितां त्यांचे कबिल्यास सालीना मोईन रुपये ४० बाबजी गायकवाड, २५ बावजी मोन्या, २० संभाजी शेवगा, एकूण पंच्याऐशी रुपये मोईन करून त्यांपैकीं हल्लीं ता० येसजी गाय- १ छ० १८ रबिलावल: - ता० २ जून इ० स० १७४०, सोमवार १