पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६४ आणि अंतर पडलें असेल [असें] बरेंकरून स्वामी ह्मणतील तर सुर्धेच आहे ! ते गोष्टी नसतां स्वामी लेंकरावरी आरोप ठेवितील तरी स्वामी मायबाप आहेत. आह्मीं लेंकरेंच असों, वरकड जाण होणें न होणें तर हा सर्व आशीर्वाद स्वामींचा स्वामींचे आशीर्वादेंकरून जें होणें तें होतें. त्यांत आमचें काय आहे? न्यून पूर्णाचे खावंदच स्वामी आहेत. जें आहे तें सर्व स्वामींचें स्वामींचे आज्ञेखेरीज आह्मी कोणते आहों ? सर्वांविस क्षमा करून कृपा करणार स्वामी समर्थ आहेत. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक १४८ ] श्री. श्रीमत् परमहंस स्वामींचे सेवेसी:- अपत्यें चिमाजीनें कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील क्षेम ता० मार्गशीर्ष वद्य दशमी मुकाम नजीक माहुली प्रांत कल्याण स्वामींच्या कृपावलोकनॅकरून यथास्थित असे विशेष. स्वामींनी कृपा करून आशीर्वादपत्र पाठविलें तें पावलें. बाजीराऊ [येथें कागद फाटल्यामुळे अक्षरें दिसत नाहींत.] श्रावणमास समाधि विसर्जन- समयीं पैका वस्त्राचा पाठवीत असतां तो देखील सा हजार रुपये वर्षास पाठवीत जाणे झणजे आणिक कांहीं मागणार नाहीं हाणून आशा केली, ऐसीयास तीर्थरूप नानांचे ती वर्षा बाराशे पावत अ सतात त्याप्रमाणे पावतच आहेत. नानाअलिकडे जे जे समयीं स्वा- मींनीं आज्ञा करीत गेले ते ते वेळेस स्वामींची आज्ञा उल्लंघिली ऐसें नाहीं. दसन्यांत स्वामींचं आगमन जालें तेव्हां साराच जामदारखाना स्वामींचे पुढे ठेविला. स्वामींनींच सारा बक्षीस केला. आतांही सर्व दौलत जामदारखाना विशाद स्वामींच्या आशीर्वादाची आहे. फला- णीच मोईन स्वामींनीं सांगावी ऐसें नाहीं. सारीच बिशाद स्वामींची १ मार्गशीर्ष वद्य १०:- ता० १५ दिसेंबर इ० स० १७३८, सोमवार ?