पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६३. अर्थ आहे ऐसें नाहीं. कापडाचा मजकूर लिहिला तरी आपले आशी- र्वादेंकरून कापडही मिळणे तें मिळतच आहे. घोडीचा मजकूर लिहिला तरी घोडी मागाहून पाठवून देऊं. जगजीवन धोंडदेव यांजविसीं लि- हिलें तरी त्यास येथें पाठवून द्यावें. त्याचें उत्तम प्रकारें चालवू. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक १४७] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- अपत्यें चिमाजीनें साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील कुशल आ- पाढ बहुल सप्तमीपर्यंत स्वामींचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं रुप्याचे तांब्याविसीं आज्ञा केली याजवरून तांब्या पाऊणशे रुपयांचा तयार करवून सेवेसी पाठविला असे. वेऊन पावली- याचे उत्तर पाठवावया आज्ञा केली पाहिजे. यानंतर स्वामींनी तीर्थरूप रा० रायांस पत्र पाठविलें त्यांत आज्ञा कीं, चिमाजीनें माझी जाण न करितां अपमान केला ह्मणोन, तर स्वामी ईश्वरस्वरूप, देव स्वामी, धर्म स्वामी, मायबाप स्वामी. आह्मी लेंकरें चरणांकित आझांपासून स्वामींचा अपमान होणें हेच गोष्ट अपूर्व आहे. इंद्रही अमरावतीहून उतरोन स्वामींचा अपमान करीन ह्मणेल तरी स्वामींचा पुण्य-प्रताप-तेजोद्भवा- पुढें तोही न्यून आहे. तेथें आलीं मानवी लेंकरें आपली यांजपासून सेवेसी अंतर पडेल ऐसें नाहीं. मनाला समाधान वाटत नव्हतें तत्समयीं दोन हजारांनिमित्य स्वामींकडील कारकून आला होता, त्याजर्सी बोलावें ऐसें मजमध्ये सामर्थ्य होतें नव्हतें तें त्यास परभारें विचारावें, - - १ आषाढ बहुल सप्तमी: - ता० २९ जुलई इ० स० १७३६ सोमवार. लेखांक १२९ मध्ये रुप्याचा तांब्या पाठवून देतो असे चिमाजी आपानी स्वा- मींस लिहिले आहे त्याप्रमाणे तो पाठविल्याबद्दल या पत्रांत उल्लेख आहे. त्याव रून या पत्राची तारीख व सन बरोबर जमतो.