पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६२ वस्त्रे बायकांस द्यावयास पाहिजेत ऐसा निरोप केसो गोंविद यांनी सां- गितला. त्यावरून शालू पातळें दोन पाठविलीं असेत. याखेरीज स्वा- मींस पांघरावयास किनखापाची दुलई करून पाठविली असे. सौभाग्य वती विरूबाईनें दोन हजार रुपये न मागतां दिल्हे ह्मणून लिहिलें, तर स्वामींचे सेवेस अंतर कोण करणार? वामनभटास नांवें तीनशें सा- ठीची फारखती पाठविली ते पावली. स्वामींनी आमची विनंति मान्य करून फारखती पाठविली [ त्यामुळे ] बहुत संतोषी जालों. साखर पक्का एकमण साताऱ्याहून देविली असे. पावती होईल. चुना चांगला पांचमण भुलेश्वरास पावता करविला असे. चुना येथें चांगला होत नाहीं. ये- थल्यापेक्षां जेजुरीस चांगला होतो; तेथून देविला असे. रा० बाजीराऊ जाते समयीं भेट न घेतां गेले ह्मणून आज्ञा, तर निरंतर स्वामींचे पा- याचा निजध्यास त्यांस आहे. तेणेंचकरून कल्याण आहे. स्वामीही कृपाकटाक्षे पाहतात तेणेंचकरून कल्याण होतें. राधाबाई थोरातीण इचें स्वामींस अगत्य, त्यावरून नारो बाबाजीस ताकीद केली असे. पाथरवटाचे वाटेस जाणार नाहीं हे विज्ञापना. [ लेखांक १४६] श्री. - श्रीमत् महाराज श्री परमहंसवावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज चिमणाजी बल्लाळ कृतानेक विज्ञापना तागाईत० ० १६ साबान पावेतों स्वामींचे कृपेंकरून असों विशेष स्वामींनी कृपा करून पत्र पाठविलें तें पावोन लिहिले वृत्त सविस्तर कळले. व्याजाचे रुपयांपैकीं दहा हजार रुपये तूर्त पाठवून देणें ह्मणून आज्ञा, ऐसीयास प्रस्तुत आ मची वोढ पैकीयाची जाइली आहे. यास्तव प्रस्तुत पैका पाठवण्यास अनुकूल पडत नाहीं. परशरामपट्टी गांवगन्ना चित्तास येईल तरी करावी हाणून आशा, तरी सर्व जे आहे तें स्वामींचे प्रतापाचें आहे. दुसरा १ छ० १६ सावानः ता० २७ आक्टोबर इ० स० १७४० सोमवार.