पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जें होणें तें आपले आशीर्वादेंकरून उत्तमच होईल. फणस १ कापा, १ बरका, काशीफळ काशीभोपळा १, केळघड केळीं सुमार ४१, केळफूल १, येणेंप्रमाणे पाठविलें तें पावलें. आपले प्रसादाची शाक भक्षूं लणजे तेणेंकरून रोग सर्व दूर होतील. दोहों दिवसां, तीहीं दि- वसां, शाकभाजी वरचेवर पाठवावयासी आज्ञा केली पाहिजे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. बागांत होत जाईल त्यांतील पाठवणें तें पाठवीत जावी. विकत घेऊन पाठवावी ऐसें काय आहे ? हे विज्ञापना. अपत्ये बाळाजी बाजीराव कृतानेक विज्ञापना येथील वर्तमान तीर्थरूपांनीं सेवेसी लिहिले आहे त्यावरून कळेल. हे विज्ञप्ति. [लेखांक १४५] श्री. श्रीमत् परमहंस स्वामींचे सेवेसी:- अपयें चिमाजीनें कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरी ये- थील कुशल ता० पौष शुद्ध द्वितीया स्वामींच्या आशीर्वादेंकरून सुख- रूप असों विशेष स्वामींनी आशीर्वादपत्र पाठविलें तें पावलें. रायाजी धोंडदेव याचें स्वामींस अगत्य ह्मणून त्याचेविसी आज्ञा केली, तरी स्वामींचे आज्ञेपेक्षां अधिक काय आहे? त्याचें उत्तम प्रकारें चालविलें जाईल. नारो अनंताची बायको सोडावयाचें पत्र दिल्हें असे. जिवाजी देवरुख्याचीं माणसें जतन आहेत. “चिरंजीव रा० बाजीरायांनीं तांदुळ देऊं केले आहेत ते पाठविणें" ह्मणून आज्ञा, त्यास येथें बहुत तलास केला परंतु तांदुळ चांगले न मिळत. याकरितां रा० बापुजी गणेशास पत्र पाठविले आहे. स्वामींची आज्ञा होईल तर तांदुळ तेथेंच खरेदी करून देतील, अगर स्वामींची आज्ञा जाली तर रुपये ८० ऐशी स्वा- मींस पावते करतील. सौभाग्यवती विरूबाई दर्शनास येणार, तेव्हां दोन ● १ पौष्य शुद्ध द्वितीयाः - ता० १ जानेवारी इ० स० १७३९ सोमवार. ११