पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७ श्री परशुराम येथील देवस्थानाची पूजाअर्चा महोत्सव मोठ्या थाटानें होऊं लागला. स्वामींच्या वार्षिक नियमाप्रमाणे त्यांची श्रावणमासची समाधि यथा- सांग होऊन समाप्तीचे दिवशीं मोठा समारंभ होऊं लागला. भाद्रपद शुद्ध चतुर्थीचे दिवशीं स्वामी आपल्या समाधिस्थानांतून बाहेर येत. त्या दिवशीं त्यांचें भक्तिभावानें दर्शन घेण्याकरितां आंग्रे व हवशी यांजकडील सरदार व केव्हां केव्हां खाशा स्वाया येत असत. त्या दिवशीं आंग्रे यांजकडील दोन तीनशें बरकंदाज व हवशी यांजकडील सिद्दी शिपाई स्वामींस बंदुकांची सलामी देत असत. नंतर स्वामींस पालखीत बसवून मोठ्या आनंदोत्सवानें श्री परशुराम देवासन्निध आणीत. नंतर तेथें कीर्तनादि उत्सव होऊन व दुसरे दिवशीं अन्न- संतर्पण होऊन समाधीची सांगता होत असे. आंग्रे व हवशी ह्यांचें नेहमीं वैर असे; परंतु या उत्सवप्रसंग उभयतांचे लोक स्नेहभावानें वागून स्वामींचा प्रसाद घेण्यास सारखेच उत्सुक असत. ह्यावरून स्वामींनीं सर्व लोकांशी प्रेमभावानें वागून त्यांची अंतःकरणें कशीं आकर्षित केली होतीं हैं चांगले व्यक्त होतें. स्वामींचा व आंत्र्यांचा जो पत्रव्यवहार उपलब्ध झाला आहे त्यावरून कान्होजीचा व स्वामींचा फार जुना स्नेह असावा असें दिसून येतें. ह्या घरा- ण्यावर स्वामींचा विशेष लोभ असल्यामुळे ह्या घराण्यांतील पुरुषांच्या हातून जीं राजकारणें झाली, त्या सर्वांत स्वामींचें अल्पबहुत अंग होतें. ह्यासंबंधाची विस्तृत हकीकत स्वामींच्या राजकारणांच्या वर्णनांत दिली आहे. कान्होजी आंग्याच्या ता० ९ एप्रिल ३० स० १७२५ पत्रांवरून ( ग्रं० ले० ९७४) स्वामींचा श्री परशुराम येथील उत्सव त्या वेळपर्यंत उत्तम प्रकारें चालला असावा व स्वामी तोपर्यंत बहुतेक कोंकणप्रांतांतच राहात असावेत असे दिसते. परंतु ह्यापुढे स्वामी महाराष्ट्रांतील नाजूक राजकारणप्रसंगानिमित्त किंवा अन्य कारणास्तव, सातारा प्रांती विशेष येऊं जाऊं लागले असावेत. काव्येतिहाससंग्रहांतील बखरीमध्यें “सन खमस अशरीनांत श्रीस्वामी घांट चटोन सातान्यासी शाहु महाराज यांजकडे आले. राजश्रीस वर्तमान कळ- तांच सामोरे जाऊन, सन्मानेंकरून वाड्यांत आणून, पूजा करोन, तीन गांव मौजे धावडशी तर्फ परळी, मौजे वीरमाडें प्रांत कन्हाड व मौजे अनेवाडी तर्फ कुडाळ हे तीन गांव राजांनीं दरोबस्त कुलबाव कुलकानू इनाम देऊन राज- २