पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नदीतीरीं राहिलों. आज राजदर्शन घ्यावयास मुहूर्त आहे. सातारीयास जाऊन दर्शन घेऊं. स्वामींच्या कृपावलोकनैकरून तेथील धंदा उर- कलीयावरी, स्वामींचे पाय पहावयास येऊन, स्वामींचा आशीर्वाद मस्तकीं घेऊन जाऊं. स्वामींच्या बागांत भाजी तो नाना प्रकारची असतच आहे. थोडी थोडी एका दो दिवसांनी पाठवावयास आज़ा करणार स्वामी समर्थ आहेत. स्वामींच्या आशीर्वादाची भाजी खादल्यानें शरीरास बहुत हितकारक असे, यास्तव ही विनंति लिहिली असे. स्वामी कृपा करणार समर्थ आहेत. चिरंजीव जनार्दन बाजीराऊ व काशीबाई लष्क- रासमेत पुण्यास पावली. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. श्री. [लेखांक १४४] श्रीमत् महाराजश्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसीः— चरणरज चिमणाजी बल्लाळ व बाळाजी बाजीराऊ कृतानेक विज्ञा- पना येथील क्षेम ता० ज्येष्ठ वद्य एकादशी मुकाम सातारा येथें स्वामींचे कृपेंकरून सुखरूप असों विशेष. आपण कृपा करून पत्र पाठविलें तें पावोन वर्तमान सविस्तर कळले. कित्येक संसारिकांचे विचार आपण लेहून पाठविले ते सविस्तर कळले. आमचें बरें व्हावें हे आपले चित्तामध्ये आहे. तन्मुळे आपण लिहितात उत्तमच आहे. आपली आमची भेटही लौकरच होईल; तदनंतर जे आपण आज्ञा करितील त्याप्रमाणे वर्तणूक करूं. काल तृतीय प्रहरीं राजश्री स्वामींचें दर्शन जाइलें, आज प्रातःकाळी राजश्री स्वामी आमचे घेरास आले होते. पुढें जें वृत्त होईल तें आपणास लेहून पाठवू. १ ज्येष्ठ वद्य एकादशीः– ता० ९ जून इ. स. १७४० सोमवार. चिमाजी आ- पांचें वरील पत्र गेल्यानंतर स्वामीकडून जें उत्तर आले त्याचें है प्रत्युत्तर दिसतें. २ राजश्री स्वामी ह्मणजे शाहू महाराज पेशव्यांच्या भेटीकरितां त्यांच्या वा- ड्यांत आले. शाहू महाराज सातान्यास रंगमहालांत राहत असत. तेथून सांप्रत जो अदालत वाडा ह्मणून प्रसिद्ध आहे तेथे ते पेशव्यांस येऊन भेटले. ह्या वाड्यांत पेशवे राहत असत.