पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५९ यथास्थित असे विशेष स्वामींनीं कृपा करून आशीर्वादपत्र पाठविलें तें पावले. रायाचें वर्तमान ऐकोन श्रम विशेष जाहले. तुझीं विवेक करून खेदाचें निराकरण करणें ह्मणोन आज्ञा, तरी जाहले गोष्टीस उपाय नाहीं ! खेद करून काय होणें ? पुढें स्वामींचा आशीर्वाद मस्तकी आहे तदनुरूप होणें तें होईल. प्रसाद शालजोडी पाठविली ते पावली. पहिले राऊ तुमच्याच आशीर्वादाचे बळेंकरून सर्व उद्योग करीत होते ते सिद्धीस जात होते. आतांही तुमचाच आशीर्वाद मस्तकी आहे. त्या बळेंकरून चिरंजीव नानाचा आमचा परिणाम उत्तम लागेल यांत संदेह नाहीं. येवढें छत्र आमचे मस्तकीं असतां आह्नीं चिंता करावी ऐसें काय आहे? कसेही अडचणीचे प्रसंग पडले ते तुमच्या कृपा-कटाक्ष- बलेकरून निभाऊन परपार जाले तैसेच आतांही सर्व प्रसंग पडतील ते परपार होऊं. स्वामींचे पाय आमचे मस्तकीं आहेत तोपर्यंत कांहीं चिंता वागवीत नाहीं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक १४३] श्री. श्रीमत् परमहंसचावा स्वामींचे सेवेसी:- अपत्यें चिमणाजी बल्लाळ व बाळाजी बाजीराऊ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरी काल शनिवारी भोईजेजवळ नदी उतरून - १ मागील पत्रांत व ह्या पत्रांत मौजेचा विरोध दृष्टीस पडतो. मागील पत्रांत स्वामींचा अनावर शोक पाहून त्यांचें चिमाजी आपांनी सांत्वन केले आहे व ह्या पत्रांत स्वामींनीं चिमाजी आपांचें समाधान केले आहे. भक्तीची मौज आहे ! २ ता० ८ जून इ. स. १७४० रविवार रोजी चिमाजी आपा व बाळाजी बा जीराव पेशवाईची वस्त्रें घेण्याकरितां साताऱ्यास आले. आदले दिवशीं ह्मणजे ता० ७ जून रोजी (शनिवारी) ते भुइँजेस राहिले. भुईंज हें वांई तालुक्यांत कृष्णा- तीरीं पुणे-सातारा रस्त्यावर एक गांव आहे. हे पत्र स्वारींतूनच लिहिले आहे. ह्यानंतर तीन दिवसांनीं ह्मणजे बुधवारी १० घटिका दिवसास बाळाजी बाजीरा- वास पेशवाईची वस्त्रे मिळाली.