पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५८ तिकडे उठोन जावें, अगर स्वामींच्या समागमें कोठें येवेल ? यावयाचें सामर्थ्य कैचें १ तेव्हां सर्वस्वास पाणी सोडून आयुष्याचे दिवस मात्र घालवावे ऐसें आह्मांस प्राप्त जालेंसें जालें. जर स्वामींनीं चित्त स्थिर करून आजपावेतो आह्मांवरी कृपाकटाक्षे पहात आले तैसेच कृपा- कटाक्षे पाहाल, आहां तैसेंच स्वस्थचित्तें राहाल, तर चिरंजीव रा० नानास बाजीरायाचे जागा आहे. स्वामींची कृपा मस्तकीं असलीया- वर यापेक्षां अधिकपणें स्वामींच्या शिष्यत्वपणाचें नांव राखील. उमेद तो आमची या प्रकारची आहे. सर्व उमेद हिमत स्वामींच्या आशी- र्वादाच्या बळाची आहे. स्वामींनीं नानावर आह्मांवर, सर्व बालकांवर नजर देऊन संतोषरूप राहावें. उदासीनता सोडावी. स्वामींचें चित्त स्थिर असलें झणजे आमच्या कल्याणाची वृद्धि होईल, यास्तव सर्वथा उदासीन न व्हावें. निरंतर बालकांचे मस्तकीं स्वामींचा आशीर्वाद असल्यावर काय न्यून होणार ? सर्वप्रकारें ऊर्जितच होईल. यांत संशय नाहीं. या पत्राचें उत्तर "चित्त स्वस्थ जालें, उदासीनता सोडिली" ऐसें पाठविले पाहिजे. आह्मांस नानास उत्तम करून दाखविल्याखेरीज तुझीं उदासीनता चित्तांत आणल्यानें उत्तम दिसाल की काय ? हा विचार स्वामींनींच चित्तांत आणावा. स्वामी सर्व जाणत आहेत. कृपा केली पाहिजे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [लेखांक १४२] श्री. श्रीमत् महाराजश्री परमहंसचावा स्वामींचे सेवेसी:- - चरणरज चिमणाजी बल्लाळ साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील कुशल ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी सौम्यवासरपर्यंत स्वामींचे कृपावलोकनें १ ह्या पत्रावरून स्वामींचें बाजीरावावरील अकृत्रिम प्रेम व्यक्त होतें. हैं पत्र वाचून कोणाच्या अंतःकरणांतून शोकरसाचे पाझर फुटणार नाहींत ? गुरु- शिष्यप्रेमाचा अपूर्व मासला या पत्रावरून दिसून येतो. २ ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी:-

-ता० २८ मे इ. स. १७४० बुधवार.