पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५७ त्याप्रमाणें वस्त्रें पासोडी दिल्ही तुमचे शरीरीं उत्तम प्रकारें व्हावें याजक रितां श्रीची प्रार्थना करीन व अनुष्ठान करीन, आणि तुमचें शरीर बरें करीन ह्मणोन पूर्ण अभयपूर्वक आज्ञापिलें, तर स्वामी साक्षात्कार ईश्वर आहेत. स्वामींचे मुखांतून आमचें बरें- आमचें शरीर उत्तम प्रकारें करावयाचें - निघाले तेव्हांच आमचें शरीर उत्तम जाइली- याची शकूनगांठ बांधिली. अत:पर येविसीं स्वामी श्रीजवळ प्रार्थना करणें ते स्वामी करितील स्वामींचे चरणारविंदाव्यतिरिक्त दुसरें दैवत आझांस काय आहे ? सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक १४१] श्री. श्रीमत् परमहंस स्वामींचे सेवेसी:- अपत्यें चिमाजीनें कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरी ये- थील कुशल ता० ज्येष्ठ शुद्ध तृतीया मुक्काम किल्ले पाल स्वामींच्या कृपा- वलोकनें यथास्थित असे विशेष. रायाचें विपरीत वर्तमान श्रुत जाली- यावर स्वामींनीं बहुत शोक आरंभिला आहे; गोमूत्र टाकिलें आहे; "बाजीसारिखा शिष्य गेला, याउपर या मुलखांतून जावें किंवा प्राण सोडावा, काय करावें तें लिहिणें" ह्मणून पत्रीं लेहून पत्र चिरंजीव रा० दादोबाजवळ दिल्हें, तें त्यांनी पाठविलें तें काल पावलें. त्यावरून आझी दुःखाच्या सागरांत मग्न जालों! एक तीर्थरूप मस्तकी आमच्या होते ते गेले ! बरें ! होणारास इलाज नाहीं ! स्वामी रायाच्या आमच्या सर्वोच्या मस्तकीं आहेत. त्या आश्रयेंकरून आजपावेतों कालक्रमणा केली. यश कीर्ति सर्व प्राप्त जालें. आतां स्वामींनीं येविसीं उदासीनता चित्त आणल्यावर आझी या मुलखांत राहून काय करणार आणि आ- मचा परिणाम काय लागणार तें कळतच आहे! तेव्हां स्वामी जातील ● . - १ ज्येष्ठ शुद्ध तृतीया:- ता० १७ मे इ. स. १७४० शनिवार २ किले पाल:- हा किल्ला कुलाबा जिल्ह्यांत भोर संस्थानांत आहे.