पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५६ ड्यावर बैसोन धावडशीस आलों. लहान्या घोड्यामुळे शरीर फार श्रमी जाहले ह्मणून लिहिलें तें कळलें. लहान्या घोड्यामुळे स्वामींचें शरीर फार श्रमी जाहले असेल संशय नाहीं. तथापि स्वामी ईश्वरी स्वरूप जाणून सर्व निभाऊन नेतात. अन्यत्र सोसेल ऐसें नाहीं. स्वामींनीं मोत्यांचा मजकूर लिहिला, ऐशास मोयें आह्नीं आज विकत घेतलीं नाहींत. पहिली घेऊन जामदारखाना ठेविलीं होतीं. पहिली किंमत पडली होती ते स्वामींस विदित केली. अन्यथा स्वामींजवळ आह्नीं बोलावें ऐसी आमची निष्ठा स्वामींचे चरणारविंदीं नाहीं. तुळाजी आंगरे याची बेडी तोडावयाविसीं आज्ञा केली त्यास पहिली, आपली आज्ञा जाहली तेव्हांच लिहिलें, बेडी तोडविली. हल्लींही नि- क्षून ताकीद बेडी तोडावयाविसीं लेहून पाठविली आहे. गंगाजल- निर्मळ उमाबाई यांनी सन्मानें पूजा केली याचा अर्थ लिहिला, तर स्वा- मींची पूजा यथाविधि केली याचें अपूर्व काय आहे ? त्यांणीं निष्ठा- पुरःसर पूजा करावी यांतच त्यांचें कल्याण आहे. घोडी उत्तम, शिं- गरवट, चार लोक मानवत ऐसी पाठवणें ह्मणोन आज्ञा, तरी स्वामींस घोडी पाठवूं ते उत्तम, स्वामींचे चित्तास येईल ऐसीच पाठवू. गणप- तरायांनीं पूजा केली याचें लिहिलें, तर गणपतरायांनीं स्वामींचा आशीर्वाद प्रशस्तवदर्भेकरून घ्यावा हेच त्यास श्रेयस्कर तदनु- रूप त्यांणी केलें, फार उत्तम आहे. जगन्नाथ धोंडदेव यांचें बरख्या रीतीनें चालवणें ह्मणून आज्ञा, तरी स्वामींचे आज्ञेपेक्षां आझांस दुसरे विशेष काय आहे? स्वामींस अगत्य त्याचें आहे, तदनुरूप लक्ष प्रकारें त्याचें चालवूं पुढें शुभचिन्हें स्वामींचे चित्तांत येऊन निशाण पाठ- विलें तें पावलें. आज्ञेप्रमाणें इत्तीवर आरोहण करून पुढे चालवूं. सोनजी व बाळकोजी यांस वस्त्रे देणें, पासोडी देणें झणून आज्ञा, १ उमाबाई:- सुप्रसिद्ध उमाबाई दाभाडे.