पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५५ इला. व्यथेनें फारच पीडिलें [१] तें वृत्त सोमाजीनें स्वामींस विदित केलेंच असेल. अलीकडेही खोकल्यानें हैराण केलें होतें, परंतु स्वामींचे आशीर्वादेंकरून आरोग्य आहे. वसई साष्टीहून निघोन मजल दरमजल भाद्रपद शुद्ध त्रयोदशीस पुण्यास आलों. स्वामींनीं पत्रीं कितेक आज्ञा केली, ऐशीयास पहिलेही स्वामींची आज्ञा उल्लंधिली नाहीं व पुढेही आपले आशेचा अव्हेर न व्हावा हेच कायावाङ्मनसा आमच्या चित्तांत आहे. एतद्विषयींची विनंति xxx रायांनीं स्वामींजवळी केली आहे; तरी सोमाजी अथवा खंडोजीस येथें पाठवावयाची आज्ञा करणार स्वामी समर्थ आहेत. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. येथें येतांच सेवेसी विनंतिपत्र पाठवावें परंतु खोकल्यानें शरीरास फारच पीडा केली आहे, अद्यापही उतार नाहीं, यामुळे चार दिवस अंतर पडलें. xxxx विघ्नें आलीं तितकींही दूर झालीं. पुढेही स्वामींच्या आशीर्वादें शरीरआरोग्य होईल. स्वामींच्या आशीर्वादापेक्षां दुसरी जोड जाणत नाहीं. स्वामी माय बाप देव ऐसेच जाणतों. स्वामींही लेकराप्रमाणें कृपा करीत आले आहेत. पुढेंही स्वामी मज लेकराचें प्रतिपालन करणार समर्थ आहेत. हे विज्ञापना. [ लेखांक १४० ] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज चिमणाजी बल्लाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील कुशल तागाईत आश्विन बहुल नवमीपर्यंत स्वामींचे कृपेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जहाला. घोड्यांस पाषाणा जाहला यास्तव लहान घो- - १ भाद्रपद शुद्ध त्रयोदशी:- ता० ४ सप्तंबर इ.स. १७३९ मंगळवार. ह्या दिवशीं चिमाजी आपा वसईची मोहिम फत्ते करून पुण्यास आले. २ आश्विन बहुल नवमी: - ता० १५ आक्टोबर इ.स. १७३९ सोमवार.