पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५४ हरि विठ्ठल याचें चालवावें, बाकी राहिली असेल ते त्याची त्यास देऊन वेतन भरून द्यावें ह्मणून, तर स्वामींची आज्ञा शिरसा वंद्य आहे. त्याचे वेतनपैकीं बाकी राहिली असेल ते त्यास पावती करूं. गोविंद राम ठाकुर याजकडील पालखीबाबत रुपये १२५ सवारों पाठवून द्या- वयाविशीं आज्ञा, त्यावरून रुपये १२५ सवाशें नारोजी समागमें पाठ- विले असेत. घेऊन गोविंद राम याचे नांवें उत्तर पाठविले पाहिजे. दसरा जाहलीयावर पुण्यास येऊं नंतर कारकुनाची व शहरची व सर दार तिघे खेरीज करून भिक्षा करून देणें ह्मणून आज्ञा, त्यास स्वामींचें येणें जाहलीया आपले पाय आमच्या दृष्टीस पडतील. येणेंकरून आमचें अभीष्टच आहे. परंतु यंदाचा विचार कोणे प्रकारचा आहे, लष्कर कोठपर्यंत गेलें होतें, मिळवून काय आर्ले, किरकोळ शिपायांची व सर- दारांची अवस्था काय आहे, तें परस्पर स्वामींस श्रुत जाहलेंच असेल. आझीं लिहावें ऐसें नाहीं. स्वामींचे आशीर्वादेंकरून सर्व उत्तमच होईल. तदोत्तर स्वामींच्या सेवेसी कोणी अंतर करील ऐसें नाहीं. यावर स्वामींची आज्ञा ते प्रमाण थोर थोर सरदार तो नियताप्रमाणे पाठवी- तच आहेत. नारो कृष्ण यास परगणियाचा हुद्दा सांगोन वेतन बरेंच करणें ह्मणून आज्ञा, तर लक्ष प्रकारें मशारनिल्हेस परगणियाचा हुद्दा सांगोन वेतन बरें करून सर्वप्रकारें चालवूं अंतर होणार नाहीं. बहुत काय लिहिणें सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [लेखांक १३९] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसवावा स्वामींचे सेवेसीः— अपत्यें चिमाजीनें कृतानेक नमस्कार विज्ञापना येथील कुशल ता० भाद्रपद बहुल चतुर्थीपर्यंत स्वामींचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनी दोन आशीर्वादपत्रे पाठविलीं तीं पावोन संतोष जा १ भाद्रपद बहुल चतुर्थी :- ता० १० सप्तंबर इ. स. १७३९ सोमवार.