पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५३ आहे. बेडी आझी काढवूं. सोडावयाची आज्ञा राजश्री स्वामींची पाहिजे. राजश्री स्वामींस विनंति करूं. त्यांणीं सोडावयाची आज्ञा दिली तरी सोडून देऊं. द्राक्षे नवीं पक्का ८॥ अदसेर व जुनीं द्राझें गोड पक्का ४४ ॥ एकूण एकशेर, व मिरें आंगरी पक्का ४४॥ अदसेर पाठविलीं तीं पावलीं. डोंगरी मिरींयाचे प्रयोजन नाहीं, तीं न पाठवावीं. गोपाळ रामराव याचे वतनाविशीं रा० बरवाजी ताकपिरास पत्र लेहून पाठविलें आहे. वरकड सविस्तर वर्तमान जबानीं सोमाजी सांगतां कळों येईल. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. मेरूलिंगास श्रावणमासीं अनुष्ठानास दानें करा- वयाची आज्ञा सोमाजी समागमें सांगोन पाठविली, त्यावरून सोमाजी समागमें रुपये १० दक्षिणा ब्राह्मणांस, ५ भोजनास ब्राह्मणांस, ए- कूण पंधरा रुपये पाठविले आहेत; घेतले पाहिजेत. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक १३८] श्री. - श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसीः- चरणरज चिमणाजी बल्लाळ व बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील कुशल ता० भाद्रपद बहुल तृतीया- पर्यंत स्वामींच्या आशीर्वादें + + + + (फाटलें आहे) असे विशेष. स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जाहला. पशमी थानें २ दोन पाठवावयाविसीं आज्ञा केली याजवरून पशमी थानें २ दोन पाठविली आहेत. घेऊन पावलीयाचें उत्तर पाठवावें. रामचंद्र म ल्हार यांजकडील पंचवीस हजार रुपये घ्यावयाविस विशदें (विषादें ?) आज्ञा केली ऐसीयास मशारनिल्हेकडील सदरहू रुपये आह्मी घेतों. घे- तलेच ऐसे समजावें. स्वामींसीं आझीं बोललीयावर हयगय करूं हें सर्व- थैव होणार नाहीं. मशारनिल्हेकडील रुपये आझीं घेतले. कळले पाहिजे. १ भाद्रपद बहुल तृतीया: - ता० ९ सप्तंबर इ. स. १७३९ रविवार, -