पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५२ मींस पत्र होतें तें पाठविलेंच आहे. तें सेवेसी प्रविष्ट होऊन विदित होईल. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक १३७] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज चिमणाजी बल्लाळ कृतानेक विज्ञापना ता० छ० २३ रबिलाखर पावेतों यथास्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें पावलें. वर्तमान सविस्तर कळले व सोमाजीनें जबानीनें सांगितलें त्यावरून- ही कळले. भाग्य व यश जे आहे तें सर्व आपले आशीर्वादाचें आहे. दुसरा विचार नाहीं. वारंवार कागदीं लिहावें ऐसें काय आहे? चित्तां- मध्यें सदैव निजध्यास आहे. आपले आज्ञेखेरीज आजतागाईत वर्तलों नाहीं व पुढेही आपली आज्ञा उल्लंघणार नाहीं. रा० रामचंद्र मल्हार यांजपासून स्वामींचे आज्ञेप्रमाणे पंचवीस हजार रुपये घेतों झ •णून पूर्वी लेहून पाठविले आहे. वर वर ल्याहावें ऐसें काय आहे ? जगजीवन धोंडोपंताचे लेक यास पाठवून द्यावें त्याचे चालवू. तुळाजी आंगरे याजविस लिहिलें तरी त्याची बेडी काढावयाचे आमचे हातीं • - १ ह्या पत्रांत नवापूरच्या नौबतीचा उल्लेख असून ती बाजीराव स्वारींतून परत येतांना आणतील असे चिमाजी आपांनी दर्शविले आहे; परंतु बाजीरावांची स्वारी त्या मार्गे न आल्यामुळे स्वामींस नौबत मिळाली नाहीं. त्यावरून पुनः स्वामींचा व बाजीरावांचा पत्रव्यवहार जाहल्याचें लेखांक ३७ वरून दिसून येईल. २ छ० २३ रविलाखर:- ता० १९ जुलई इ. स. १७३९ गुरुवार - - ३ तुळाजी आंगरे:- हा कान्होजी आंगरे यांची दुसरी बायको गहिनाबाई हिचा पुत्र मानाजी आंगरे हा गादीवर असल्यामुळे त्याचें व तुळाजीचें वैमनस्य येऊन मानाजीनें पेशव्यांस अनुकूल करून घेऊन तुळाजीशीं युद्ध केले व त्यास कैदेत टाकिलें. तुळाजी पुढे ब्रह्मेद्रस्वामींस शरण गेला त्यावरून त्याची बेडी. काढण्याबद्दल स्वामींनी पेशव्यांस लिहिले आहे. स्वामींचा व आंगऱ्यांचा पत्रव्यव दार फार होता.