पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५१ ● वीस मोत्यें दर मोतीं रुपये २ दोन प्रमाणे पाठवणे ह्मणोन, तरी स्वामींचे आशेपेक्षां विशेष काय आहे ? मोतीं घेऊन सेवेसी पाठवितों. पांचशेर कृष्णागर पाठवून देणें ह्मणोन आज्ञा तरी, प्रस्तुत संग्रहीं नव्हता. मुंब- ईहून आणून सेवेसी पाठवून देऊं. "यश संपादोन सुखी आलेत हे वृत्त अवगत होऊन कोटिशः संतोष जाहला. आह्मांस द्रव्याची इच्छा नाहीं, तुमची कीर्ति ऐकोन परम सुखी आहों" ह्मणोन कित्येक आज्ञापिलें; तरी सर्व स्वामींचे आशीर्वादाचा प्रताप आहे. स्वामी ईश्वरतुल्य आहेत. आह्मां लेकरांस भूषण देऊन पत्र आज्ञा करितात हें स्वामींचे थोरप- णास उचित आहे. सर्व स्वामींचे आज्ञेनुरूप होतें. स्वामी ज्यावरी कृपा करून करवितात त्याचे हस्ते घडून येतें इतकाच अर्थ आह्मी स्वामींचे आशांकित असों. तीर्थरूप रा० रायांची पत्रे छ० २६ जिल्कादचीं आलीं. कोट्यांचा तह करून अहिरवाडीयांतून दतिया वोडसें प्रांतें गेले, स्वा- - १ छ० २६ जिल्कादः - ता० ७ मार्च इ. स. १७३८ रोज मंगळवार. हें पत्र आह्मांस उपलब्ध झाले नाहीं ! २ बाजीराव निजामाचा पराभव करून कोट्यास गेले. तेथील राजा दुर्जन- साल हा निजामउल्मुलुकाच्या बाजूचा होता, परंतु निजामचा पराभव होतांच तो बाजीरावांस येऊन भेटला. त्याच्या साह्याकरितां बाजीराव कोट्यास गेले व ते थील नहरगड किल्ला एका मुसलमानाने बळकाविला होता तो त्याजकडून घेऊन दुर्जनसालास परत दिला. दुर्जनसालानें संतुष्ट होऊन बाजीरावांशीं मित्रत्व जोडिलें. ही हकीकत टॉड यांच्या 'राजस्थानाच्या इतिहासांत' दिली आहे. परंतु त्यांत ह्या मोहिमीचा सन संवत् १७९५ ह्मणजे इ. स. १७३९ हा दिला आहे. त्याबद्दल शंका आहे! टॉड साहेबांच्या ह्मणण्याप्रमाणे इ. स. १७३९ है साल ग्राह्य मानिले तर ह्या पत्राची तारीख ११ मे इ.स. १७३९ रोज शुक्रवार ही पडते. परंतु ह्या तारखेस चिमाजी आपा वसईच्या लढाईत होते असें लेखांक ५२ वरून सिद्ध आहे व प्रकृत पत्रांत तर चिमाजी आपा स्वारींतून 'यश संपा- दोन सुखी आले' असा स्पष्ट उल्लेख आहे तेव्हां ह्या पत्राचें साल इ. स. १७३८ हेच असावे असे व्यक्त होतें.