पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ आधार आहे. धावडशी गांव स्वामींस सन इहिदे अशरीन ह्मणजे सन १७२०-२१ ह्या वर्षाच्या माघ शुद्ध नवमीस इनाम मिळाल्याचा अगदी पहिला उल्लेख धाव- डशी संस्थानच्या दप्तरांत सांपडतो. त्यावरून स्वामींनी शाहु महाराजांची मर्जी प्रसन्न करून बाजीरावास पेशवाईचीं वस्त्रे मिळवून दिलीं व नंतर हें इनाम मिळविले असावें असें दिसतें स्वामींचा कीर्तिनाद सर्व कोंकण प्रांतामध्ये दुमदुमूं लागून कान्होजी आंग्रे, प्रतिनिधि व हवशी हे स्वामींची चरणसेवा मोठ्या भक्तीनें करूं लागले होते. त्यामुळे स्वामींचा कारखाना नांवारूपास येऊन श्री परशुराम येथील देवालय, श्री रेणुकेचें देवालय, गणपतीचे देवालय, मारुतीचे देवालय, धर्मशाळा, पोंवळी, दीपमाळा, व मुख्य देवालयाचा सभामंडप इतकीं कामें पुरीं झालीं होतीं. श्री परशुराम येथें ब्राह्मणांची वस्ती अगदीं नव्हती ती स्वामींच्या प्रय लानें विशेष होत चालली. हबशाच्या दहशतीमुळे परागंदा झालेले देवाचे पुजारी देवासमीप येऊन राहिले. स्वामींनी सर्व लोकांचा चरितार्थ यथायोग्य रीतीनें चालावा अशी तजवीज केली. देवास मिळालेल्या इनाम गांवांवर बापू- जीपंत, चिमणाजीपंत व धोंडोपंत ह्यांचे नातेवाईक आणवून त्यांची योजना केली. चिमणाजीपंतांचे मामा त्रिंबक कृष्ण मोघे व चुलत बंधु संभाजी नारायण हे सुवर्णदुर्गास आंग्रे ह्यांचे पदरीं चाकरीस होते. त्यांना चारचार रुपये दरमहा करून आपले पदरीं ठेविलें. त्रिंबक कृष्ण ह्यांची गोठणे येथील कामावर योजना केली, व संभाजी नारायण ह्यांस परशुरामीं श्रीसन्निध ठेविलें. नंतर त्यांचे बंधु अंताजी नारायण आले. त्यांस मौजे आंवडस येथे ठेविलें. तेथें स्वामींची बाग होती. तेथील देखरेख व जावसाली कागदपत्रांची ने आण ह्रीं काम त्यांकडे सोपविलीं ह्याप्रमाणे स्वामींचा कारखाना वाढत चालला. . १ धावडशीची अगदी पहिली सनद आह्मांस उपलब्ध झाली नाहीं. ती उपलब्ध झाली असती झणजे ह्या सनाची पक्की खातरी झाली असती. धाव- डशी ह्या गांवीं मूळ धावड लोकांची वस्ती असून तेथे पुढे स्वामींनीच गांव वसविला. स्वामी पूर्वी साताराप्रांती आले झणजे धावडशीनजीक मेरुलिंग नामक डोंगर आहे तेथे राहत असत. त्या स्थानास नजीक व छत्रपतीच्या राजधानीस जवळ असे पाहून हे धावडशी गांव स्वामींनी पसंत केले असावें.