पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५० [लेखांक १३६] श्री. १ श्रीमत् महाराज श्री परमहंसवावा स्वामींचे सेवेसी:- अपत्यें चिमाजीनें साष्टांग नमस्कार विज्ञापना येथीस कुशल ता० वैशाख शुद्ध चतुर्दशीपर्यंत स्वामींचे आशीर्वादेंकरून असे विशेष. स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जाहला. “न- वापुरास नौबत आहे ते हत्तीवर घालून श्रीस पावती करूं ह्मणोन चिरं- जीव रा० रायांनी मान्य केलें आहे तरी नौबत पाठवणें, व रा० अंतोबा नाईक गुडे यांजकडे पैका आहे तो वसूल करून पाठवून देणें" झणोन आज्ञा. ऐशीयास, येविसींचें आह्मांस स्मरण आहे. स्वामींचे आ- ज्ञेपेक्षां आझांस अधिकोत्तर काय आहे? त्याजकडे मुजरद जासूद पाठ- वणें ते पाठविलेच आहेत; परंतु जासुदांनीं दो गोष्टींचा निर्वाह होऊन येईल न येईल तें सेवेसी विदित आहे. तीर्थरूप रा० राव ते मार्गे आले तरी नौबत बराबर आणतील व अंतोबा नाईक गुडे याजकडीलही पैका वसूल घेतील. कदाचित् रायांचें तिकडून येणें न जाले आणि आमची त्यांची गांठ पडली तरी स्वामींचे आज्ञेप्रमाणें आह्मी निर्वाह करून घेऊन सेवेसी प्रविष्ट करूं. घांटा २ व पेट्या २ दोन पाठवाव याविशीं आज्ञा केली त्यास, स्वामींचे आज्ञेप्रमाणे घांटा व पेट्या सेवेसी पाठवून देऊं. दुलया २ एक सोंवळ्याची व वोवळ्याची पाहिजे, त्यांपैकीं सोंवळ्याची दुलई पाठविली ते पावली व वोवळ्याची राहिली ते पाठवणें झणोन आज्ञा; त्यास आज्ञेप्रमाणे चिरंजीव रा० नाना यांस लिहिलें आहे. ते सेवेसी दुलई पाठवितील. "श्रीचा प्रसाद पांढरा मध घट १ एक पाठविला असे; घेणे. आणखी यत्न केला आहे, आला झणजे पाठ- वून देऊं" ह्मणोन त्यास स्वामींनी पांढरा मध १ एक घट पाठविला तो पावला. आणखी पाठवणें तो स्वामी कृपा करून पाठवितीलच. पंच- " . , १. वैशाख शुद्ध चतुर्दशी :- ता० २२ एप्रिल इ. स. १७३८ शनिवार - ●