पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४९ त्याजबराबर त्याचे पुत्र गाजुद्दीनखान व वोडसेकर व दतियेकर व जयसिंगाचा पुत्र व अहीर व रोहिला देखील पन्नास हजार फौज जमा आहे. सादतखानाचा भाचा व कोट्याचा राजा वीसहजार फौज आणिक येणार आहे. रायांची त्याची गांठ लौकरच पडावी ऐसें आहे. माळव्याच्या सुभ्यांत रायांस उतरूं न द्यावें ऐसें पातशाहापासीं मान्य करून आले आहेत. स्वामींचा आशीर्वाद मस्तकीं आहे तेणें करून परिणाम उत्तम प्रकारेंच होईल. कांहीं फिकिर वाटते ऐसें नाहीं. सांप्रत आझी येथें आहों. औरंगाबादेस सुलतानजी जानोजी वगैरे मों- गली फौज दहा बाराहजार जमा आहे. आझी लौकरच गंगातीरास येऊं. विदित व्हावें ह्मणून लिहिलें असे. कृपा केली पाहिजे हे विज्ञापना. [लेखांक १३५] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- अपत्यें चिमणाजी बल्लाळ साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील कुशल ता० माघ शुद्ध दशमीपर्यंत स्वामींचे आशीर्वादेंकरून असे विशेष. तीर्थरूप रा० रायांचा व नवाबाचा सलुख जाहला. तीर्थरूपांचीं पत्रे छ० २७ रमजानचीं आलीं त्यांची नकल पाठविली आहे त्याजवरून कळेल. सारांश, स्वामींचा आशीर्वाद तीर्थरूपांचे मस्तकीं पूर्ण आहे. तत्प्रभावेंकडून निजामनमुलुक हतगर्व होऊन सलुख केला, हे गोष्टी लहान सामान्य जाली ऐसें नाहीं. सविस्तर स्वामींस विदित व्हावें या स्तव लिहिलें असे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. - १ कोट्याचा राजा:-दुर्जनसाल (इ. स. १७२४-१७४७). २ सुलतानजी जानोजी:- निजामाकडे जाऊन मिळालेली ही निंबाळकर मंडळी - होत. रावरंभा नांवाने ह्यांचे घराणे अद्यापि हैद्राबादेकडे प्रसिद्ध आहे. -- ३ माघ शुद्ध दशमी:- ता० १९ जानेवारी इ. स. १७३८ गुरुवार ४ छ० २७ रमजानचे पत्र लेखांक ३५ पहा. ह्यांत निजामाच्या व पेश- व्यांच्या सलुखाचें सविस्तर वर्णन - आहे.