पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४८ नपूर्वक सांगणे तैसें सांगितले. तळ्याजवळ राहिलों. आझी उपाशींच येथें आलों सामग्री जी लागली ती येऊन घेऊन जितके लोक समागमें होते तितक्यांसहित भोजन करून सायंकाळी स्वार होऊन गेलों. गो- विंदपंतही जेजुरीस गेले होते. तेही धांवून आले. xxxx देवळावर चुना घालावयाचें काम आहे, त्यास माती घालावी किंवा चुनाच अगदीं घालावा ऐसें आह्मांस विचारिलें, त्यास माती न घालावी, चार दिवस अधिक लागले तर लागूं द्यावे, परंतु अगदीं चुनाच घालणें ह्मणून सां- गितलें असे. हे विनंति [ लेखांक १३४] श्री. श्रीमत् परमहंस भार्गवरामबावा स्वामींचे सेवेसी:- अपत्यें चिमाजीनें कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील क्षेम ता० पौष शुद्ध प्रतिपदा स्वामींच्या कृपावलोकनें मुकाम तापीतीर परगणे वरणगांव यथास्थित असे विशेष. तीर्थरूप रा० राऊ खरगोणावरून पुनाशाजवळ नर्मदा उतरून गेले. रा० आवजी कवडे देखील ऐशी हजार घोडे समागमें आहे. निजामनमुलुक सिरोजेजेवळ आले आहेत. - १ पौष शुद्ध द्वितीया:- ता० ११ दिसेंबर इ. स. १७३७ रविवार २ बाजीरावांची निजामउल्मुलुकावरील ही स्वारी होय. ह्या स्वारीची हकी कत लेखांक ३३|३४|३५|३६ ह्या पत्रांमध्ये आली आहे. ह्या स्वारीस बाजीराव चिमाजी आपांसह छ० ११ रजब ह्मणजे ता० २५ आक्टोबर इ. स. १७३७ रोजी निघाले. ते छ० १० सावान ह्मणजे ता० २२ नोव्हेंबर रोजी सांगवी प्रांत माळवा येथून भोपाळाकडे वळले व आपा परत खानदेशांत येऊन तारापूर साष्टी इकडे आले. ३ खरगोण:- हे नेमाड जिल्ह्यांत एक गांव आहे. हें सांप्रत होळकरसरकारच्या ताब्यांत आहे. ४ पुनासा:- हें नेमाड जिल्ह्यांत नर्मदेच्या कांठीं एक लहानसें गांव आहे. ५ सिरोंज:- हें टोंक संस्थानांत एक शहर आहे.