पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वावा ऐसी आज्ञा, त्यास ताफता मेळवून पाठवून देऊं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापेना. [ लेखांक १३३] श्री. श्रीमत् परमहंस स्वामींचे सेवेसी:- ० अपत्यें चिमाजीनें कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल ता० छ १५ सेवाल माघ वद्य द्वितीया शनवार स्वामींच्या कृपावलोकनेंकरून यथास्थित असे विशेष. आज श्री भुलेश्वर येथील देवालयाची इमारत पहावयास आलों. वरील इमारत हिंडून फिरोन अवधी पाहिली. उत्तम प्रकारें इमारत जाहली आहे. कामही उत्तमप्र- कारें चालत आहे. गांवाजवळील तळेंही पाहिलें. चांगली इमारत झाली आहे. पाणीही चांगले आहे. पुढें यापेक्षां विशेष पाणी होईल. तळ्याजवळ दोन प्रहर राहिलों, कारखान्याचे लोक गवंडे पाथरवट व मजुरी व नारोपंत व कृष्णाजीपंत व लखमोजी नाईक ऐसे अवधे जणांस बोलावोन समाधानाच्या गोष्टी सांगणें त्या सांगितल्या. उत्तम- प्रकारें जपून सारा दिवस काम करीत जाणें; जर कामास चुकाल तर मुलाहिजा करणार नाहीं आणि जपून काम करा ह्मणजे बावास विनंति करूं आणि सर्वप्रकारें तुमचें बरेंच करणें तें करूं; ऐसें कितेक समाधा- - १ लेखांक ४६ च्या पूर्वीचें हे पत्र असावे असे वाटतें. लेखांक ४६ मध्ये बाजीराव नर्मदा उतरून वोडशास पावले असतील असा उल्लेख आहे. पृष्ठ ७१ मधील २ री टीप पहा. २ छ० १५ सवाल माघ वद्य द्वितीया १७३७. ३ लेखांक ४६ ह्या पत्रामध्ये स्वामींनी चिमाजी आपांस भुलेश्वरास जाऊन तेथील देवालयाचें काम वगैरे पाहण्याबद्दल आज्ञा केल्याचा उल्लेख आहे. त्याप्र माणें चिमाजी आपांनी तेथे जाऊन तेथील सर्व व्यवस्था पाहिल्याची हकीकत ह्या पत्रांत दिली आहे. शनवार : - ता० ५ फेब्रुवारी ३० स०