पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४६ कोणे गोष्टीची चिंता वाटत नाहीं. आपण आमचे ईश्वरच आहां. दु- सरा अर्थ आहे असें नाहीं. स्वामींनीं आज्ञा लिहिली त्याप्रमाणेच वर्त- णूक करूं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक १३२] श्री. श्रीमत् परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- ● अपत्यें चिमाजीनें कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरी ये- थील कुशल तागाईत पौष शुद्ध त्रयोदशी स्वामींच्या कृपावलोकनेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें पावोन बहुत समाधान जालें. तीळ शर्करा पाठविली ती पावली. स्वामी बालकांचा गौरव स्मरण करून करतात तेणेंकरून आनंद होतो. तो पत्रीं काय ह्मणून लिहावा ? सारांश, स्वामी चित्तापासून कृपा करितात तेणेंकरून दिवसेंदिवस कल्याण अधिकोत्तर होतें. तीर्थरूप रा० राऊ नर्मदा उतरून गेले. मजल दर मजल वोडशास जातील. रा० म ल्हारजी होळकर व राणोजी शिंदे यांनी मेहनत करून स्वामींच्या आशीर्वादें एक दोन ठाणीं प्रवाशांची मातवर हस्तगत केलीं ह्मणून त्यांची पत्रे रायास आली होतीं. पुढें रायाकडील वर्तमान येत जा ईल तें वरचेवर स्वामींचे सेवेसी लेहून पाठवूं. वरकड " कित्येकांस कि- त्येक प्रकारें दंगे करणारांनी केले आहेत, याकरितां सावध राहत जाणे. शामलाकडील कोणी येत जाईल त्याचा विश्वास धरीत न जाणें." ह्मणून आशा लिहिली व निरोप सांगोन पाठविला तोही कळला. तर स्वामींचे आज्ञेप्रमाणेंच वर्तणूक करूं. मानाजी आंगरे यांजवर लोभ करीत जावा ह्मणून आशा, तर ते आझांसीं सुधे वर्ततात ऐसें व तेले तर त्यावर लोभच आमचा आहे. ताफता पांच गज पाठ- - ● १ पौष शुद्ध त्रयोदशीः ता० ३ जानेवारी इ. स. १७३७ सोमवार. -