पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४५ ह्मणोन लिहिलें तर उत्तम गोष्ट जाइली परम आनंद जाहला. "कांहीं आक्षेप उभयतांवरी देखिला आहे. विरोबाबराबरही पत्र पाठविले आहे. त्या पत्राचे उल्लेख चित्तांत आणून एकशें तीन रुपये पत्रदर्शनीं पाठ- वून देणें. आणखी एक होम दुसरा होम करूं. एक होम ब्राह्मणद्वारा मेरूस केला. हा होम मीं स्वतःच करीन. नीलवर्णी ताफता याचे गज होमांत घालावयास पाठवून देणें. जायफळ व जायपत्री व लवंगा व मिरें यांचा होम करावा लागतो. तो जिन्नस कोठीस आहे. तुझीं पाठ- वावा नलगे" ह्मणून आज्ञा. वेदमूर्ति रा० वीरेश्वरभट पुण्याचे मार्गे गेले; आझी प्रस्तुत पाटस तर्फेत आहों; यामुळे पत्र यावयास विलंब लागला. तेही पत्र मागाहून येऊन पावेल. परंतु तें पत्र यावयास विलंब लागला यास्तव हल्लीं एकशें तीन रुपये व पांच गज नीलवर्णी ताफता सेवेसी पाठविला आहे. हा घेऊन होम स्वामींचे विचारें जैसा कराव याचा असेल तैसा केला पाहिजे. स्वामी ईश्वरी अंश, तन्मुळे पुढील भविष्य स्वामींस कळतें. दुसरीयास ऐसें कैचें कळणार! " चिरंजीव बा- जीराऊ यांस लेहून पाठवणें जे, त्या प्रांतें गेले आहां. ज्येष्ठमासपावेतों कोणाचा विश्वास न धरणें. कोणा परकीयाचे हातचें व त्याचे घरीं जे- वण, पाणी, विडा कांहींच न घेणे. तैसेंच तुझीं व तुमचे उभयतांचे पुत्र देखील याचप्रमाणे कोणाचा विश्वास न धरणें बहुत सावधपणे असत जाणें. ज्येष्ठमास गेलीयावरी मग पुढे तुझांस बहुत दिवस कोणाचें भय नाहीं. राज्याराम चिरकाल कराल" ह्मणून आज्ञा, तर आपले आज्ञेप्रमाणें वर्तणूक करितील; व आझी व चिरंजीव, स्वामींचे आज्ञेप्रमाणे वर्तणूक करूं. स्वामींचा आशीर्वाद आमचे मस्तकीं आहे तेणेंकरून आझांस - १ मेरु:- मेरुलिंग हें एक शंकराचें रमणीय स्थान धावडशीनजीक एका डोंगरावर आहे. येथील हवा व पाणी फार आरोग्यकर असून येथें तपस्वी ज नांस समाधान वाटण्यासारखी शांतता व सृष्टिसौंदर्य वसत आहे. १०