पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रांत इचें चालवायाविर्शी आज्ञा, त्यास स्वामींचे आज्ञेप्रमाणे तिचें चालविले जाईल. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. पै० छ० १८ रेबिलावल सन सत्रा. [लेखांक १३० ] १४४ श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- - चरणरज चिमणाजी बल्लाळ चरणावरी मस्तक ठेवून सा० नमस्कार विनंति येथील क्षेम ता० छ० २२ रैमजान पावेतों स्वामींचे कृपेंकरून यथास्थित असो. यानंतर छ० १८ रमजानीं रा० लिंबाजी अनंत व मानाजी आंगरे यांनी कुलाबा व हिरा बुरूज व खांदेरी हस्तगत केलीं. वरकड किल्यांची राजकारणें आलीं. त्यांचा बंदोबस्त करावयास्तव तीर्थरूप रा० राव छ० २१ रोजीं फौजेसहवर्तमान गेले आहेत. कुला- बीयास जाऊन तेथील बंदोबस्त करून वरकडही जें कार्य होणें असेल तें होईल. तीर्थरूप मातुश्रीबाई श्रीमहायात्रेस सवाईजीचे पुरोहित आले होते त्या समागमें छ० २३ मिनहूस जातील. सेवेसी कळावें ह्म- गोन लिहिले आहे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक १३१] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसवावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज चिमणाजी बल्लाळ कृतानेक विज्ञापना. येथील वर्तमान ता० माघ शुद्ध चतुर्थी पावेतों महाराजांचे कृपेंकरून पत्र पाठविलें तें उत्तम समयीं पावोन बहुत आनंद जाहला. शरीरी आरोग्यता जाहली - - १ छ० १८ रविलावल सन सवा:-ता- १७ जुलई इ. स. १७३६ शनिवार २ छ० २२ रमजानः- ता० १३ जानेवारी इ. स. १७३७ गुरुवार ३ मातुश्रीबाई:- राधाबाई-चिमाजीआपांची आई. ४ सवाईजी:- सवाई जयसिंग-जयपूरचे राजे. ५ माघ शुद्ध चतुर्थी: ता. २३ जानेवारी इ. स. १७३७.