पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४३ काय ? परंतु आतां जंजिरा बळावत चालला. चहुंकडून साहित्य येत चाललें यामुळे मनसबा कठीण प्राप्त जाला आहे. बरें, जे गोष्ट नजरेनें पाहावी ते आह्मांस कळती होणार अर्थ कांहीं आझांस कळत नाहीं. होणार अर्थ स्वामींच्या ध्यानांत आलाच असेल त्याचप्रमाणे योग घडून जें कार्य होणें, यश येणें, तें स्वामींच्या आशीर्वादें येईल. सकलादेविस लिहिलें त्यास, सकलाद येथें उदंड यत्न केला, परंतु मिळत नाहीं. या करितां रा० अंबाजीपंतास लिहिलें. जर सातारा मिळाली तर घेऊन पाठवितील. मुद्दल पैका स्वामींचा व यास व्याजाचा ऐवज देणें राहिला आहे, त्यास व्याज कां देत नाहीं हाणून लिहिलें, तर स्वामींच्या वच- नाप्रमाणें आह्मी चालत आहों. त्यांत अंतर करीत नाहीं. मुदत केली आहे त्याप्रमाणें ऐवज देतों. हे विनंति. श्री. [लेखांक १२९] श्रीमत् महाराज राजश्री परमहंसवावा स्वामींचे सेवेसी:- अपत्यें चिमणाजी बल्लाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथील कुशल आषाढ शुद्ध त्रयोदशीपर्यंत स्वामींचे आशीर्वादेंकरून असों विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेख- नार्थश्रवणें संतोष जाहला. शामलाचे यशाचा अर्थ स्वामींनी लिहिला, ऐशास आझी स्वामींचे आज्ञांकित यश हानि सर्व स्वामींचें येविसींचें संकट स्वामींसच आझांस स्वामींचे चरण निजदैवत आहे. स्वामींनीं सुदर्शन शामलावरी प्रेरिलें तत्प्रभावें शामल विलयास गेला. यश स्वामींचेंच आहे. पाऊणशा रुपयांचा तांब्या करून पाठवायाविशीं आज्ञा केली, तरी आज्ञेप्रमाणें तांब्या करून पाठवून देतों. राधाई थो- - १ आषाढ शुद्ध त्रयोदशी:- ता० ९ जुलई इ. स. १७३६ शुक्रवार २ शामल: - जंजिऱ्याचा हबसी शिद्दी सात ह्याची व चिमाजी आपाची ल - . ढाई होऊन तो ठार मारला गेला.