पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४२ कराचे मनसुबीविशीं लिहिले तर त्याचीही मनसुबी मनास आणून जें वर्तमान असेल तें सेवेसी लिहून पाठवूं हे विज्ञापना. [ लेखांक १२७ ] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- अपत्यें बाजीराव बल्लाळ प्रधान साष्टांग नमस्कार विज्ञापना. ये- थील कुशल ता० कार्तिक शुद्ध प्रतिपदापर्यंत स्वामींचे आशीर्वादें- करून यथास्थित असों विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें पा वोन संतोष जाला. राजश्री नामाजी धोंडदेव व हरि विठ्ठल या उभ यतांविशीं बहुत अवश्यक पुरस्सर आज्ञा केली, ऐशास उभयतांस धंदे लाऊन चालवितों ह्मणोन स्वामींचे समक्ष मान्य केले आणि त्यास अं तर पडेल हे गोष्टी सर्वथैव होणें नाहीं. आह्मांस स्वामींचे आज्ञेपेक्षां दुसरे अधिकोत्तर काय आहे? उभयतांचें चालवायास अंतर होणार नाहीं. स्वारींस नेणें जाहलें तरी स्वारीचं साहित्य करून नेऊं विदित जाहले पाहिजे, कृपा केली पाहिजे, हे विज्ञापना. चिमणाजी आपा. श्री. श्रीमत् परमहंसवावा स्वामींचे सेवेसी:- अपत्यें चिमाजीनें कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल ता० आश्विन शुद्ध तृतीया मंदवार पावेतों यथास्थित असों विशेष स्वामींनीं कृपाळु होऊन पत्र पाठविलें तें पावोन बहुतसें समा- धान जालें. सारांश, जंजिरीयाची मसलत सोडून न यावें येविशीं कि- त्येक पर्याय लेहून आज्ञा लिहिली, ऐसीयास, जंजिन्याचें दर्शन घ्यावें, देवब्राह्मणाचा आशीर्वाद न घ्यावा, हे गोष्ट कोणाचे चित्तांत येईल की १ आश्विन शुद्ध तृतीया मंदवारः - ता० २९ सप्तंबर इ.स. १७३३.? [लेखांक १२८ ] - -