पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४१ नाहीं हैं यथार्थच; परंतु सांप्रत वोढीच्या प्रसंगामुळे अनुकूल पडिलें नाहीं. श्रावणमास अनुकूल पडेल तेव्हां वेदमूर्तीस प्रविष्ट करूं. अंतर पडणार नाहीं. विदित जाहले पाहिजे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक १२५ ] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसीः- चरणरज बाजीराव बल्लाळ प्रधान कृतानेक नमस्कार विज्ञापना. येथील कुशल ता० आश्विन बहुल सप्तमीपर्यंत स्वामींचे आशीर्वाद- करून यथास्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें पावलें. नारो गणेश यांस कोंकणांत हुद्दा सांगणे आणि नारो कृष्ण यांणीं पहिले थोरथोर हुद्दे केले आहेत याजकरितां यांस वरघांटें हुद्दा सां- गणे झणून आज्ञा, ऐशास स्वामींच्या आज्ञेप्रमाणे उभयतांस हुद्दे सांगोन वेतन करून एकास कोंकणांत व एकास वरघांटें रवाना करूं. स्वामींचे आज्ञेपेक्षां अधिकोत्तर काय आहे? स्वामींनीं प्रसाद श्रीफल पाठविले तें पावलें. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- अपत्यें बाजीराऊ बल्लाळ प्रधान कृतानेक विज्ञापना येथील कुशल माघ बहुल द्वितीयापर्यंत स्वामींचे आशीर्वादें करून असे विनंति स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तेथें आज्ञा कीं, मौजे ढवळपुरी परगणे पारनेर या गांवाविशीं आज्ञा केली, ऐशास मौजे मजकूर रा० तावजी थो रात याजकडे आहे त्याप्रमाणें करारच असे. बाबतीचा तगादा परगणे मजकुरचे कमाविसदार मौजे मजकुरास करीत होते त्यासही ताकीद- पत्र दिल्हें आहे. त्याउपरी मौजेमजकुरास सालमजकुरीं इकडील उपसर्ग लागणार नाहीं. आह्मांस स्वामींची आज्ञा ते प्रमाण असे. मुंढवे- [लेखांक १२६] - - .