पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५ हळूहळू प्रवेश होत चालला व त्यांच्यावर छत्रपतींच्या प्रमुख सरदारांची निष्ठा बसूं लागली असें ह्मणण्यास हरकत नाहीं. व स्वामी ३० स० १७२० पूर्वी वरघाटें कधीं आले होते किंवा नाहीं ह्याची विश्वसनीय माहिती मिळत नाहीं. तथापि त्यांचा व शाहु महाराजांचा चांगला परिचय असून पत्रव्यवहार देखील चालू असावा असा तर्क करण्यास जागा आहे. बाळाजी विश्वनाथ व चिमणाजी दामोदर ह्या दोन प्रमुख महाराष्ट्र- सरदारांचा व स्वामींचा पत्रव्यवहार होता है तर निश्चित आहे. बाळाजी वि श्वनाथ ह्यांच्या ता० २८ एप्रिल इ० स० १७१५ च्या (लेखांक १९ ) पत्रा- वरून स्वामींची व त्यांची पैशाची देवघेव होती असे स्पष्ट दिसून येते. बा •ळाजी विश्वनाथ ह्यांस स्वामी द्रव्यद्वारें उत्कृष्ट मदत करीत असत, व त्यांस राजकारणप्रसंगी वेळोवेळी सहा मसलत देत असत हे निर्विवाद सिद्ध आहे. स्वामींनीं चिमाजी आपास लिहिलेल्या एका पत्रांत (लेखांक २८३) “नाना माझा होता तो एकनिष्ठ होता. सय्यदांचा सल्ला झाला त्यामुळे इतकें अभीष्ट झालें. दिल्लीची मसलत सुरू झाली. " इत्यादि उद्गार काढिले आहेत. त्यावरून व वेळोवेळी बाळाजी विश्वनाथ ह्यांच्या भक्तीविषयीं केलेल्या स्तुतीवरून वा •ळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीतील मराठ्यांच्या राजकारणांत स्वामींचें वर्चस्व चांगलेच असले पाहिजे हैं उघड होतें. बाळाजी विश्वनाथ ह्यांचें व स्वामींचें विशेष दळणवळण असल्यामुळे त्यांचे पुत्र बाजीराव व चिमाजी आपा ह्यांवर स्वामींची फार कृपा जडली असावी व त्यांनाही स्वामींची योग्यता कळल्यामुळे त्यांच्याविषयों पूज्यबुद्धि उत्पन्न झाली असावी ह्यांत शंका नाहीं. बाळाजी विश्वनाथ सासवड मुकाम ता० २ एप्रिल ३० स० १७२० रोजीं मृत्यु पावले. नंतर त्यांचे वडील पुत्र बाजीराव ह्यांस मसूर मुक्कामी ता० १७ एप्रिल इ० स० १७२० रोजी पेशवेपदाचीं वस्त्रे मिळालीं. ह्या वेळचे स्वामींचे कागदपत्र उप- लब्ध झाले, तर बाजीरावांस प्रधानगिरीचीं वस्त्रें देण्यांतही स्वामींची शाहु महा- राजांजवळ शिफारस असावी असे दिसून येईल. परंतु अस्सल कागदपत्रांच्या अभावामुळे ह्या सर्व घडामोडींमधील स्वामींची चळवळ समजण्यास मार्ग नाहीं. तथापि ह्या प्रसंगास स्वामी शाहु महाराजांस भेटण्याकरितां मुद्दाम आले असा- वेत व त्यांच्या वज़नाचा चांगला उपयोग झाला असावा असे मानण्यास एक