पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४० ठाकुर प्रस्तुत तुझांजवळ आला आहे. तरी याजपासून पन्नासा रूप- यांचे सासे (१) रुपये घेऊन पाठवणें ह्मणून लिहिलें तें कळलें. ऐशास गोविंद राम ठाकुर यास बोलाऊन स्वामींचे आज्ञेप्रमाणे सांगितले. त्यास त्यांणीं उत्तर केलें कीं, बावांनीं पालकीनिमित्य पन्नास रुपये राम ठाकुर यापाशीं दिल्हे होते हैं आपणास कांहीं ठावकें नाहीं. आपला बाप नि वर्तला तेव्हां आपण साता महिन्यांचा होतों. आपला वडील भाऊ नारो ग़म वाडीस होता तेव्हां बावांचे चरण दोन तीन वेळां वाडीस पाहिले; परंतु ते वेळेस बावा कांहीं बोलले नाहींत. हंबीरराव मोहित्या- पासून बावांचें येणें वाडीस न जाहलें, परंतु अलीकडे चौदा वर्षे देशांत नांदतो परंतु बाबा कांहीं बोलिले नाहीं. आपला वडील भाऊ नारो राम मरून सात वर्षे जालीं. त्यांणीं कांहींएक मजकुर कधींही बो- लिला नाहीं. बेल तुळशी उचलून द्यावयाचा अर्थ तर आपण कशा- वरून बेल तुळशी उचलून द्याव्या ? आपणास कांहींच ठावकें नाहीं. बाबा ईश्वरस्वरूप आहेत. आज्ञा करितील तर पन्नास रुपये पाठवून देईन ह्मणून उत्तर केलें. विचार करून पाहतां गोविंद रामास कांहीं ठाऊक नाहीं. यांणी बेल तुळशी कैशा उचलून द्याव्या ? स्वामींची आज्ञा उल्लंघन न करावी या विचारें स्वामी आज्ञा करतील तर पन्नास रुपये याजपासून घेऊन पाटवून देऊ. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [लेखांक १२४] श्री. श्रीमत् महाराज श्री स्वामींचे सेवेसी:- - चरणरज बाजीराऊ बलाळ प्रधान कृतानेक साष्टांग नमस्कार वि ज्ञापना. स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें पावोन बहुत समाधान जाहले. वेदमूर्ति राजश्री बापुभट यांस वर्षासन पावत असतें, त्यास यंदा पावलें नाहीं; तरी यांस ऐवज प्रविष्ट करणें झणून आज्ञा केली. ऐसीयास भट गोसावी यांसी वर्षासन पावत असतें तें यंदा पावलें