पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३९ आठ दहा दिवस घोळितो. परंतु माझें लेंकराचें संरक्षण सर्व स्वामींचे हाती आहे. आपल्यास कळेल तसें करावें. चिरंजीव आपानें कवळा- नारिंग हजारा (?) आपल्याकडे लावावयासाठी पाठविलें, तें पाठविलें आहे. घेऊन उत्तर पाठविले पाहिजे. नारिंग एकच आपल्याकरितां पाटविले तें पाठविलें असे. आह्मी तों जाण्याचे संकटांत पडलों आहों. कांहीं उपाय सुचत नाहीं ! योग काय आहे कळत नाहीं ! परंतु सर्व चिंता आपल्यास आहे. तेथें मीं चिंता करून काय होणें आहे ? सेवेसी श्रुत होय हे विज्ञप्ति. [ लेखांक १२२] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- अपत्यें बाजीराव बल्लाळ प्रधान साष्टांग नमस्कार विज्ञापना ये- थील कुशल आश्विन शुद्ध तृतीयापर्यंत स्वामींचे आशीर्वादेंकरून असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें पावोन संतोष जा हला. किनखाप व दुपेटे उत्तम पाठवणें अथवा रुपये पाठवणे ह्मणोन आज्ञा केली; त्याजवरून रुपये ४०० चारशें खंडोजीबराबर पाठविले आहेत. सेवेसी प्रविष्ट जालीयाचें उत्तर पाठवावयास आज्ञा करणार स्वामी समर्थ आहेत. सेवेसी श्रुत होय हे विज्ञप्ति. [लेखांक १२३] - श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसवावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज बाजीराव बल्लाळ प्रधान कृतानेक विज्ञापना येथील कुशल ता० कार्तिक शुद्ध तृतीयापर्यंत स्वामींचे आशीर्वादेंकरून यथा- स्थित असे विशेष. स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें पावलें. राम ठाकुर वाडीकर याजपासीं पूर्वी आह्मीं पालकी निमित्त पन्नास रुपये दिल्हे होते, तो वारला; पालकी आली नाहीं. त्याचा पुत्र गोविंद राम -