पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३८ करणार स्वामी वडील आहेत. सांप्रत चिरंजीव रा० दादोबा सेवेसी येऊन विनंति करितील, ते मान्य करून सदयपणे अभयपत्र पाठवा- यासी आज्ञा केली पाहिजे. स्वामींचे आशीर्वादें वसई फत्ते जाहली हे मोठीच गोष्ट जाली. परंतु लष्करची खराबी जाली व कर्ज जालें ते लिहितां पूर्वत नाहीं. आह्मी कोण्या गोष्टीची चिंता करीत नाहीं. सर्व चिंता आपल्यास आहे. बुडालें तरलें सर्व आपले आहे. आझी लेकरें, ज्याणें झाड लाविलें तोच वाढवील. रक्षण तोच करील. आपण वडील मायबाप आहांत. मी सर्वस्वी अन्यायी, तरी तुमचा ह्मणवितों कृपा करणार स्वामी समर्थ आहेत. जे आहे हे सर्व स्वामींचे आशीर्वादाचेंच आहे व सर्व स्वामींचेंच आहे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक १२१] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंस स्वामींचे सेवेसी:- - ● चरणरज बाजीराव बल्लाळ प्रधान कृतानेक नमस्कार विनंति येथील क्षेम श्रीचे आशीर्वादें ता० छ० ६ जमादिलाखर यथास्थित असे. विनंति- श्रीचें आशीर्वादपत्र आलें. तेथें कित्येक निषेध नवाबाचे दर्शनास जाऊं नये ह्मणून केलं ते यथार्थच आहे. परंतु राजश्रीचे आज्ञेस इ- लाज काय आहे ? आझांस श्रीची आज्ञा प्रमाण जितका आपला यत्न न जाण्याचा तितका करितों. ऐसें असतां जें घडेल तें घडो. सर्व संकट निवारण करणार श्री समर्थ आहां. दुभत्याविशीं लिहिलें तरी येथेंही झैस एक व्याली नाहीं. दुभतीयाचें मानसिकच आहे. पालखीचा मज- कूर लिहिला तरी पूर्वी जिवबाबरोबर विनंति सांगून पाठविली आहे. पुढे श्रीचे दर्शनानंतर जे विनंति कर्तव्य ते करूं. विदित जार्ले पाहिजे. नवाबाकडे जाणें तो प्राप्त जालेंसें दिसतें. न जावें तरी खावंद इतराज होतात. जावेंसें तो मनःपूर्वक नाहीं. कार्यही नाही आणि विश्वासही नाहीं. परंतु जाणें होतें खरें. बरें, सर्व चिंता आपल्यास आहे. आणीक -