पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३७ वतार, जे चित्तांत स्वामींच्या येतें व मुर्खेकरून वक्तृत्व होतें, तें घडून येतेंच येतें. वसई हस्तगत होईल ह्मणून स्वामी बोलिले आहेत, तदनुरूप वसई हस्तगतच होईल यांत संदेह नाहीं, व आह्मांस सर्व भरंवसा स्वामींचे आशीर्वादाचा, त्यास आशीर्वाद आमचे मस्तकीं व कृपाही विशेष, तेणेंकरून जें करूं तें सिद्धीस पावेल. यानंतर स्वामींचीं दोन तीन पत्रे आलीं त्यास कांहीं हर्षाचें वर्तमान स्वामींस लिहावें यास्तव जाब पाठविले नाहींत. स्वामींचा आशीर्वाद फलकारास आला. हे इर्षाचें वर्तमान ऐकून स्वामींस हर्ष होणार यास्तव येविसीं लिहिलें आहे. वसई आदिकरून राहिली स्थळें तीं स्वामींच्या आशीर्वादें हस्त- गत होतील. विदित जाहले पाहिजे. आह्मी स्वामींचीं लेंकरें आहों. जें होणें तें आपले प्रतापें होतें. तारापूर व केळवें येथें रोकडे मोर्चे ला- गतां तींही स्थळें स्वल्पकाळें आपले आशीर्वादें हस्तगत होतील. तदु- पर वसईचे कार्याची पैरवी आपले आज्ञेप्रमाणे होईल. वसई फत्ते होते ह्मणून अभय दिले त्याप्रमाणें अचिरकालेंच होईल. यांत संदेह नाहीं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञप्ति. आपण [ लेखांक १२० ] श्री. श्रीमत् महाराज श्री स्वामींचे सेवेसी:- चरणरज बाजीराऊ बल्लाळ प्रधान कृतानेक विज्ञापना. येथील कुशल श्रीकृपें यथास्थित असे विशेष स्वामींकडून सोमाजी आला होता, त्यास, स्वामींनीं त्याजला माणूस पाठवून माघारा नेला. तोही न पुसतां गेला. ऐशीयास स्वामींच्या तों चित्तांत राग बहुत आला आहे. ऐशीयास आझांस सर्वखें स्वामी वडील आझीं लेंकरें. दुसरी गोष्ट देव दैव तर आझांस स्वामी अनन्यभावें आमची निष्ठा पायांजवळ. या गोष्टीस स्वामी अंतरसाक्ष असोन आमचा राग चित्तांत आणावा ऐसा नाहीं. यद्यपि वेळनसार आला असला तरी क्षमा करून कृपा -