पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कुशल ता० ज्येष्ठ शुद्ध नवमी भोमवार मुकाम सातारा सुखरूप असो विशेष. काल इंदुवारीं भुइंजेस होतों. राजदर्शन घ्यावयाचा काल मुहूर्त होता. त्यास, भुइंजेहून धावडशीस स्वामींची भेट घेऊन पुढें राजदर्शनास जावें ऐसा विचार करून येत होतो. त्यास, राजश्री स्वामी चंदनवंदनाकडे आले; यामुळे तिकडे जावें लागलें. तेथें जाऊन ज रंड्याजवळी भेट घेऊन काल चार घटका रात्रीस राजश्री स्वामीसमा- गमें सातारा आलों. सेवेसी श्रुत होय हे विज्ञप्ति. [ लेखांक ११९ ] श्री. श्रीमत् परमहंस श्री स्वामींचे सेवेसी:- चरणरज बाजीराव बल्लाळ प्रधान कृतानेक विज्ञापना येथील कु- शल ता० छ १२ संवाल पावेतों स्वामींचे आशीर्वादें यथास्थित असे विशेष आजी छ० मजकुरीं चिरंजीव रा० आपाचें पत्र आलें कीं, मा- हिमास मोर्चे छ० २९ रँमजानीं लाविले, त्यास छ० ९ सँवाली माहिम हस्तगत जाहलें. तैसेंच रा० राणोजी शिंदे यांणीं खताळवाडे व डाहाणु हे दोनी जागा घेतल्या. संतोषाचें वर्तमान स्वामींस कळावे यास्तव लि हिले आहे. सारांश, स्वामींचा कोप फिरंगी यावरी जाहला असतां त्याचें बरें होईल हें सर्वथा घडणारें नाहीं. आपण साक्षात् ईश्वर अ . - - १ ज्येष्ठ शुद्ध नवमी भोमवारः - ता० १६ मे इ. स. १७३८ मंगळवार २ भुइंज: - वाईजवळ लहानसे गांव आहे. ३ चंदन वंदनः – हे डोंगरी किल्ले सातारा जिल्ह्यांत आहेत. - ४ जरंडा:– हा डोंगर सातारा जिल्ह्यांत कोरेगांव तालुक्यांत आहे. रामदास स्वामींनी संस्थापित केलेल्या मारुतीचे स्थान येथे फार प्रसिद्ध आहे. ५ छ० १२ सवाल:- ता० १२ जानेवारी ३० स० १७३९ शुक्रवार. ६ छ० २९ रमजानः - ता० ३० दिसेंबर ३० स०१७३८ शनिवार. ७ छ० ९ सवालः - ता० ९ जानेवारी ३० स० १७३९ बुधवार. - -