पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३५ चांदपत्रीं सांभाळ केला पाहिजे. सर्व होणें तें आपले आशीर्वादें होतें. पैका मिळोन कर्जापासून मुक्त होऊं व वसईचें कार्य होई तें करणार स्वामी समर्थ आहेत. सेवेसी श्रुत होय हे विज्ञप्ति. श्री. श्रीमत् परमहंस परशरामबावा स्वामींचे सेवेसी:- अपत्यें बालकें चरणरज बाजीराऊ कृतानेक विज्ञापना. येथील क्षेम ता० वैशाख शुद्ध प्रतिपदा रविवार यथास्थित असे. विज्ञापना-म- हाराजांनी पत्र पाठविलें तें पाऊन अर्थ सविस्तर कळला. त्यास, भलते गोष्टीची तांतडी न करावी. जें होणें तें स्वामींचे मनोगतानुरूपच होईल. येथील अर्थही लिहितां पुरवत नाहीं. सांगोन पाठवूं त्यावरून कळेल. जितकी सेवा केली तितकी निर्फळ आहे. सेवेसी श्रुत होय. आतां देश- त्यागास जावें, किंवा घरीं कवाडें अडकावून बसावें, किंवा ईश्वरचरण जवळ करावें ऐसे अर्थ दिसतात. जो अर्थ घडेल तो लिहून पाठवू हे विति. [ लेखांक ११८ ] [ लेखांक ११७ ] - श्री. श्रीमत् परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- - चरणरज बाजीराऊ बल्लाळ प्रधान साष्टांग नमस्कार विनंति येथील - १ वैशाख प्रतिपदा रविवारः – ही मिति रा. मोडक यांच्या जंत्रीमध्ये शुद्ध बरोबर मिळत नाहीं. तथापि मजकुराच्या संदर्भावरून बाजीराव कर्जग्रस्त झाले होते त्या प्रसंगाचें हें पत्र असावें असे दिसते. त्यावरून पाहतां, इ.स. १७३८ ह्या सालीं वैशाख शुद्ध द्वितीया दोन असल्यामुळे प्रतिपदा रविवारी असण्याचा संभव आहे. तेव्हां ते साल ग्राह्य धरिलें तर ह्या पत्राची मिति ता० ९ एप्रिल इ. स. १७३८ ही अमूं शकेल.