पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३४ येथे दाखल जाहलों. आपणास कळावे यास्तव लिहिले आहे. स्वामींनी आपलेकडील वर्तमान सदैव लिहिले पाहिजे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. पै ॥ छ० २२ जिल्काद शनिवार. [ लेखांक ११६] श्री. श्रीमत् महाराज परमहंस श्री स्वामींचे सेवेसी:- - ......... चरणरज बाजीराऊ बलाळ प्रधान कृतानेक विज्ञापना येथील कु- शल ता० छ० २९ रमजाने जाणून निरंतर आशीर्वादपत्रीं सांभाळ केला पाहिजे. विशेष आपली आज्ञा घेऊन पुण्यास आलियावरी फौजबंदी करून मजल दरमजल माळवा प्रांतें आलों...... ( येथील मजकूर फाटला आहे.)... नवाब चाल करून आले. त्याची आमची सान्निघता होतांच स्वामींच्या आशीर्वादाचे प्रतापें नवाब भुपाळच्या आसन्यास गेले. छ० ३ रमजानीं भुपाळास गोटावरी चालून जाऊन युद्ध केलें व निरंतर युद्ध छ० २६ रमजान पावेतों जाहलें. दाणापाणी बंद केलें. मोठी महागाई जाहली. रुपयास एकशेर अन्न न मिळे. तेव्हां नवाबांनीं मध्यस्त पाठवून स्नेह संपादिला. माळवा आह्मांस मेहेरबान होऊन दिल्हा पातशाही सनद करून द्यावयाची मान्य केली. तमाम राजे भेटीस पाठविले. मोठा समारंभ जाहला. सारांश, स्वामींचा आशीर्वाद मस्तकीं व धण्याचा पुण्यप्रताप पदरीं, तन्मुळे यशप्राप्ति होऊन कार्य- भागही जाहला. पुढेही स्वामींचे आशीर्वादें जें जें होणें तें उत्तमच होईल. स्वामींस कळावें यास्तव लिहिले आहे. स्वामींनीं निरंतर आशी- ● १ छ० २२ जिल्काद शनिवार - ता० ८ मार्च इ. स. १७३५. - २६० २९ रमजानः - ता० १० जानेवारी इ० स० १७३८, रोज मंगळ- - वार. लेखांक ३६ ह्या पत्रानंतर हे पत्र लिहिले आहे असे दिसतें. ३ ह्या प्रसंगाचे सविस्तर वर्णन लेखांक ३५ मध्ये आहे.